EXCLUSIVE : राजू शेट्टींची 5 तास गुप्त बैठक, स्वाभिमानी स्वबळावरच लढणार

EXCLUSIVE : राजू शेट्टींची 5 तास गुप्त बैठक, स्वाभिमानी स्वबळावरच लढणार

राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वात पक्षाची तब्बल पाच तास गुप्त बैठक झाली आहे.

  • Share this:

संदीप राजगोळकर, कोल्हापूर, 23 फेब्रुवारी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वात पक्षाची तब्बल पाच तास गुप्त बैठक झाली आहे. स्वाभिमानी आगामी लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी स्वबळावर लढणार असल्याचा निर्णय या बैठकीत झाला आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

काय झालं बैठकीत?

राजू शेट्टी, रविकांत तुपकर यांच्या उपस्थितीत बैठक

बैठकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय

बुलडाणा, वर्धा मध्ये स्वाभिमानी उमेदवार देणार

येत्या 27 तारखेला माढ्यामध्ये एल्गार मेळावा

28 तारखेला राज्य कार्यकारिणी बैठक पुण्यात होणार

राजू शेट्टी यांचा काँग्रेस आघाडीशी काडीमोड झाल्याची शक्यता

कोल्हापूरमधील हॉटेलमध्ये रात्री 11 ते पहाटे 4 पर्यंत बैठक

बुलढाणा, वर्धा जागेवर स्वाभिमानी संघटना ठाम

दरम्यान, भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर राजू शेट्टी यांनी राज्यभरात वेगवेगळी आंदोलन करून सरकारला जेरीस आणलं. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी महाआघाडीची वाट निवडली.

त्यानुसारच गेल्या काही दिवसांपासून जागावाटपावरून महाआघाडीशी चर्चा सुरू झाली होती. काँग्रेस राष्ट्रवादीला स्वाभिमानीने सहा जागांचा प्रस्ताव दिला होता. त्यातील तीन जागांवर शेट्टी ठाम होते. हातकणंगले, बुलढाणा आणि वर्धा या जागा शेट्टींनी मागितल्या होत्या.

बुलढाणा जागा रविकांत तुपकर आणि वर्ध्यात माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांच्यासाठी जागा हवी होती. परंतु,यावर अद्याप कोणताही निर्णय झाला नाही.

Special Report: पवारांकडून पार्थच्या उमेदवारीला ब्रेक, 'मावळ'मधून कोण?

First published: February 23, 2019, 2:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading