मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'भीक मागून सदाभाऊंची उधारी चुकवणार, अजून कोणाची आहे?' सदाभाऊंसाठी 'स्वाभिमानी' आली धावून!

'भीक मागून सदाभाऊंची उधारी चुकवणार, अजून कोणाची आहे?' सदाभाऊंसाठी 'स्वाभिमानी' आली धावून!

माजी मंत्री सदाभाऊ खोत (former minister sadabhau khot) यांच्याकडे रस्त्यात अडवून एका हॉटेल मालकाने जुनी उधारी मागितल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. यावर आता स्वाभीमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे.

माजी मंत्री सदाभाऊ खोत (former minister sadabhau khot) यांच्याकडे रस्त्यात अडवून एका हॉटेल मालकाने जुनी उधारी मागितल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. यावर आता स्वाभीमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे.

माजी मंत्री सदाभाऊ खोत (former minister sadabhau khot) यांच्याकडे रस्त्यात अडवून एका हॉटेल मालकाने जुनी उधारी मागितल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. यावर आता स्वाभीमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे.

  • Published by:  Rahul Punde
सांगली, 18 जून : मागच्या दोन दिवसांपूर्वी माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (former minister sadabhau khot) यांच्याकडे रस्त्यात आडवून एका हॉटेल मालकाने जूनी उधारी मागितल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 2014 सालापासून उधारी दिली नसल्याने संतप्त हॉटेल मालकाने सदाभाऊंवर थेट आरोप केले. यानंतर सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषद घेत त्या हॉटेल मालकावरही आरोप केले. या सगळ्या प्रकरणावर माजी खासदार राजू शेट्टी (former mp raju shetti) यांनी प्रतिक्रीया दिली आहे. खोत यांच्याकडे उधारी मागणारा हॉटेल मालक हा आमचा जूना कार्यकर्ता असल्याचे शेट्टी म्हणाले. यानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे आणि भागवत जाधव यांनी आम्ही भीक मागून उभारी देणार असल्याचे सांगितले आहे. काय आहे प्रकरण? सांगोला तालुक्यातील मांजरी येथील मामाभाचे हॉटेल मालक अशोक शिणगारे यांनी गुरूवारी (दि. 16) माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना अडवून 2014 सालची उधारी मागितली होती. त्यावर सदाभाऊ खोत यांनी 'मी याची कसलीही उधारी केलेली नाही आणि अशोक शिणगारे याला मी ओळखत नाही. हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी त्याला पाठवून हा स्टंट केला आहे, असा आरोप केला होता. याच दरम्यान सदाभाऊ खोत यांचे एकेकाळचे सहकारी राजू शेट्टी यांनी मात्र अशोक शिणगारे हा आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेतला सक्रिय कार्यकर्ता होता. तो जेव्हा सक्रिय होता तेव्हा त्याने काही आंदोलनातही सहभाग घेतला होता. आता तो आमच्या संघटनेत नाही. मात्र, पूर्वी होता. 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत त्याने आमच्या उमेदवाराला सहकार्य केले होते असे ही शेट्टी म्हणाले. स्वाभीमानी संघटना देणार उधारी एका हॉटेल चालकाने सदाभाऊ खोत यांना रस्त्यावर अडवून उधारी मागितली आहे. सदाभाऊ हे आमच्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील आहेत. या घटनेमुळे आमच्या वाळवा तालुक्याचा अपमान महाराष्ट्रभर होत आहे. त्यामुळे आम्ही भीक मागून पैसे गोळा करून त्या हॉटेलचे मालक अशोक शिणगारे यांची उधारी देणार आहे" अशी माहिती  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे  जिल्हाध्यक्ष महेश खराडे व भागवत जाधव यांनी दिली आहे.

Raju Shetti : सदाभाऊ खोत यांच्याकडे उधारी मागणारा हॉटेलवाला माझा जूना कार्यकर्ता, राजू शेट्टींचा खुलासा

यापुढे सदाभाऊंची उधारी आम्ही देणार : स्वाभीमानी खराडे आणि जाधव म्हणाले कि सदाभाऊ यांना उधारीसाठी इथूनपुढे कोणीही अडवून आमच्या वाळवा तालुक्याचा अपमान करू नये, आमच्याशी संपर्क साधावा आम्ही ती उधारी वारंवार भीक मागून भरू " किती आहे उधारी? दोन दिवसांपूर्वी सांगोला तालुक्यातील एका हॉटेल व्यावसायिकाने माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना रस्त्यावर अडवून उधारी मागितली. त्यावर महाराष्ट्रात खूप चर्चा सुरू आहेत. सदाभाऊ खोत हे वाळवा तालुक्यातील आहेत, त्यांच्या तालुक्यातील भागवत जाधव यांनी मात्र 'आमच्या वाळवा तालुक्याची बदनामी करू नका. त्यांचे 66 हजार 450 रुपये आम्ही भीक मागून उधारी भरणार आहोत. सदाभाऊ पूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे होते. ज्यांच्याकडे सदाभाऊची उधारी असेल त्यांनी आमच्याशी संपर्क करावा."असे त्यांनी म्हटले आहे. हॉटेल मालक शिणगारे म्हणतात दरम्यान हॉटेल मालक शिणगारे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले कि, पैसे बुडवायचे म्हणून राष्ट्रवादीचे नाव सदाभाऊ घेत आहेत , पण मी राष्ट्रवादीचा नव्हे तर रघुनाथ दादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता आहे. मला माझ्या हॉटेलाची उधारी मिळेपर्यंत सदाभाऊ यांना अडवणार आणि पैसे वसूल करणार अशी स्पष्ट भूमिका उधारीसाठी सदाभाऊंचा ताफा अडवणारे हॉटेल मालक अशोक शिणगारे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. माझा आणि राष्ट्रवादीचा कसलाही संबंध नसून माझ्यावर असलेल्या गुन्हेगारी केसबाबत सदाभाऊ खोटी माहिती देत आहेत. मी कधीही वाळूचा व्यवसाय केलेला नाही. माझ्यावर कोणत्याही केस नसून ज्या केस असतील त्याला मी तोंड देण्यास खंबीर आहे.
First published:

Tags: Raju Shetti, Sadabhau khot

पुढील बातम्या