'ऊसाला मिळणारा योग्य दर मोदी किंवा पवारांमुळे नव्हे तर आमच्या हिंमतीमुळे'

'ऊसाला मिळणारा योग्य दर मोदी किंवा पवारांमुळे नव्हे तर आमच्या हिंमतीमुळे'

राज्यातील शेतकऱ्यांच्या उसाला मिळणारा योग्य दर हा पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे नव्हे तर आमच्या लढ्यामुळे आणि कायद्यामुळे मिळत असल्याची स्पष्टोक्ती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केली आहे.

  • Share this:

जालना,9 फेब्रुवारी: राज्यातील शेतकऱ्यांच्या उसाला मिळणारा योग्य दर हा पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे नव्हे तर आमच्या लढ्यामुळे आणि कायद्यामुळे मिळत असल्याची स्पष्टोक्ती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केली आहे. राजू शेट्टी यांनी जालन्यात आयोजित पत्रकार परिषदेत 'न्यूज 18 लोकमत'ने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले.

तरच राज ठाकरेंच्या मोर्चाला पाठिंबा..

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत काढलेल्या मोर्चाला राजू शेट्टी यांनी पाठिंबा दिला आहे. पाकिस्तानी आणि बांगलादेशातील घुसखोरांना हाकलून द्या एवढीच असेल, तर आमचा राज ठाकरे यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे, असे राजू शेट्टी यांनी सांगितले. राजू शेट्टी यांनी रविवारी औरंगाबाद आणि जालन्याचा दौरा केला.

राजू शेट्टी म्हणाले, बाहेरच्या देशातून जे घुसखोर येतात त्याचे समर्थन कुणीही करणार नाही. आम्हीही करत नाही. त्यामुळे बाहेरच्या घुसखोरांना हुसकाऊन लावा, इतकी राज ठाकरेच्या मोर्चाची मागणी असेल, तर आमचा त्याला पाठिंबा आहे. परंतु केंद्र सरकार नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि एनपीआरच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरत आहे. सीएए हा तर सरळसरळ संविधानाच्या विरोधातील कायदा आहे.

तर सर्वसामान्य जनतेचं काय?

संविधानाने या देशात जात, धर्म, लिंग आणि पंथ या आधारावर कोणत्याही व्यक्तीसोबत भेदभाव केला जाणार नाही, असे आश्वासन दिले आहे. सीएए कायदा या आश्वासनाला हरताळ फासणारा आहे. एनआरसीमध्ये जवळपास 40 टक्के लोकांना आपला जन्माचा पुरावाच देणे अशक्य आहे. माझंच उदाहरण सांगतो. 52 वर्षांपूर्वी माझा जन्म माझ्या घरात झाला. त्यावेळी हॉस्पिटलमध्ये जन्म झालेला नाही. त्यामुळे माझा स्वतःचाच जन्माचा दाखला नाही. मी दोनवेळा खासदार, एकदा आमदार आणि एकदा जिल्हा परिषद सदस्य होतो. माझ्यासारख्याची अशी अवस्था असेल, तर सर्वसामान्य जनतेचं काय आहे, असेही राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितले.

First Published: Feb 9, 2020 08:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading