मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

हरिहरेश्वर किनाऱ्यावर संशयास्पद बोट, काय आहे 1993 ब्लॉस्टशी कनेक्शन?

हरिहरेश्वर किनाऱ्यावर संशयास्पद बोट, काय आहे 1993 ब्लॉस्टशी कनेक्शन?

फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात याच भागात 30 ते 35 ग्राम विस्फोटकं सापडली होती. त्यामुळे श्रीवर्धन इथे तस्करी होण्याच्या घटना काही नव्या नाहीत. श्रीवर्धनची निवड करण्यामागेही खास कारण आहे.

फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात याच भागात 30 ते 35 ग्राम विस्फोटकं सापडली होती. त्यामुळे श्रीवर्धन इथे तस्करी होण्याच्या घटना काही नव्या नाहीत. श्रीवर्धनची निवड करण्यामागेही खास कारण आहे.

फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात याच भागात 30 ते 35 ग्राम विस्फोटकं सापडली होती. त्यामुळे श्रीवर्धन इथे तस्करी होण्याच्या घटना काही नव्या नाहीत. श्रीवर्धनची निवड करण्यामागेही खास कारण आहे.

    श्रीवर्धन, 18 ऑगस्ट : रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर दोन बोटी आढळल्या आणि एकच खळबळ उडाली. ही बोट आढळल्याने प्रशासन यंत्रणाही अलर्टवर आली. या बोटीमध्ये शस्त्र सापडल्याची माहिती समोर आली, त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झालं. अशा प्रकारे बोट अचानक आल्याने संशयाची पाल चुकचुकली आणि 1993 रोजी झालेल्या मुंबईतील बॉम्बस्फोटाची पुन्हा आठवण झाली. हरिहरेश्वर इथे सापडलेल्या बोटीसंदर्भात सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. मात्र या घटनेमुळे प्रशासन यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. पोलिसांचाही बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तर नौदलाने रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात जनजागृती अभियान सुरू केलं आहे. या एका घटनेनं पुन्हा एकदा अंगावर काटा आणणारी 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटाची आठवण करून दिली. 1993 रोजी साखळी हल्ल्यात वापरण्यात आलेले RDX श्रीवर्धन इथल्या शेखाडी समुद्रकिनाऱ्यावरून आणण्यात आले होते. या ठिकाणी 900 हून अधिक लोकसंख्या असली तरी विशेषत: अल्पसंख्यांक नागरिकांच्या मनात आजही त्या घटनेच्या जखमा उमटलेल्या आहेत. 15 वर्षांपूर्वी घडलेल्या त्या घटनेतून सावरणं कठीण आहे. raigad boat : हरिहरेश्वरच्या किनाऱ्यावर आढळली संशयास्पद बोट, घटनास्थळाचा पहिला VIDEO तस्कऱ्यांची पहिली पसंत का? फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात याच भागात 30 ते 35 ग्राम विस्फोटकं सापडली होती. त्यामुळे श्रीवर्धन इथे तस्करी होण्याच्या घटना काही नव्या नाहीत. श्रीवर्धनची निवड करण्यामागेही खास कारण आहे. श्रीवर्धनपासून समुद्रकिनारा हा साधारण 50 किमी दूर आहे. तिथे केवळ एक सीमा शुल्क अधीक्षक असतो. त्याच्यासोबत तीन निरीक्षक आणि कर्मचारी असतात. या भागामध्ये कमालीची शांतता देखील असते. तिथे ग्रामीण लोकांची ये-जा असल्याने जास्त प्रश्नही विचारले जात नाहीत. त्याशिवाय मुंबईच्या किनाऱ्यापेक्षा या किनाऱ्यावर अधिकाऱ्यांकडून होणारी प्रश्नांची सरबत्ती आणि चेकिंग हे दोन्ही कमी आहे. त्यामुळे या भागातून तस्करी होण्याचंही प्रमाण जास्त असल्याचा दावा स्थानिक लोकांचा आहे. 1993 च्या स्फोटाशी काय कनेक्शन शेखाडी हे तस्करांसाठी पहिली पसंत असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं. त्याच्या गावातील सुमारे डझनभर लोकांना घेरण्यात आलं होतं. काही पळून जाण्यात यशस्वी देखील झाले. खाडीचे सरपंच गोपाळ पांडुरंग धाडवे मात्र अगदी ठाम होते: "काय चालले आहे याची आम्हाला अजिबात कल्पना नव्हती. या गोष्टी रात्री घडतात. आम्हाला कोणतीही संशयास्पद हालचाल दिसली नाही असंही ते म्हणाले होते. BREAKING : रायगडमध्ये समुद्र किनाऱ्यावर आढळली संशयास्पद बोट, शस्त्र सापडल्याची माहिती मुंबईतील बॉम्बस्फोटप्रकरणी जवळपास 30 जणांना या परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. 26 मार्च रोजी चार जण, 15 एके-56 आणि दोन पिस्तुले मुंबई पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आली. काही वाहने आणि बोटीही पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. 1993 मध्ये समुद्र मार्गानेच मुंबईत घुसखोरी करून घातपाताचा कट रचण्यात आला होता. एक दोन नाही तर एकापाठोपाठ 13 स्फोट घडवून आणण्यात आले होते. या स्फोटात 257 लोकांचा मृत्यू झाला होता. तर 700 हून जास्त लोक जखमी झाली होती. त्यामुळे कोणत्याही प्रकारे जोखीम न उचलता आता प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. हरिहरेश्वर किनाऱ्यावर आढळलेली बोटीमध्ये . या संशयास्पद बोटीमध्ये 3 एके 47 रायफल्स आणि 225 राऊंडस आढळून आले आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहे. जिल्हाभरात नाकाबंदी करण्यात आली आहे. रायगडमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. तर समुद्रातही पेट्रोलिंग वाढवण्यात आलं आहे. कोणताही घातपात होऊ नये यासाठी नागरिकांनाही अलर्ट राहण्याचं आवाहन करण्यात आला आहे. तर मुंबईतील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दहशतवाद्यांचा मुंबईवर डोळा आहे. त्यामुळे मुंबईतील सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे. पोलिसांकडून नाकाबंदी देखील करण्यात आली आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Ratnagiri

    पुढील बातम्या