मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'सारथी'ला बदनाम करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करा’, संभाजीराजे पुन्हा आक्रमक

'सारथी'ला बदनाम करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करा’, संभाजीराजे पुन्हा आक्रमक

'मराठा समाजाने आत्ताच याबाबत समाधानी न होता, नेमकं कोणाच्या सांगण्यावरून सारथी बंद करण्याचा घाट घातला गेला? याची शहानिशा करून घेतली पाहिजे. '

  • Published by:  Ajay Kautikwar

मुंबई 15 ऑक्टोबर: राज्य सरकारने 'सारथी’ संस्थेला पुन्हा स्वायतत्ता देण्याचा आदेश आज काढला. त्यामुळे मराठा मोर्चाची आणखी एकम मागणी पूर्ण झाली. या संस्थेसाठी खासदार संभाजीराजे यांनी आंदोलन करत शासनावर दबाव निर्माण केला होता. सरकारच्या या निर्णयानंतर संभाजीराजे यांनी सारथीला जाणीवपूर्वक बदनाम करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी केली आहे.

फेसबुकवर यासंदर्भात पोस्ट लिहून त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. या ते म्हणतात, 'सारथी'ला आधी जाणीवपूर्वक बदनाम करून स्वायत्तता घालवली. ही स्वायत्तता टिकविण्यासाठी समाजाच्या वतीने आम्ही अनेक आंदोलने केली, जीवनात पहिल्यांदा 'सारथी'च्या कार्यालयासमोर रस्त्यावर बसून लाक्षणिक उपोषण केले. तसेच हा मुद्दा आजपर्यंत सातत्याने लावून धरल्यामुळे आज 'सारथी' संस्थेला स्वायत्तता देण्याच्या दृष्टीने एक पाऊल टाकले गेल्याचे समजते.

अजून बरेच टप्पे बाकी आहेत. सारथी बाबत निर्णय घेण्यासंबंधीचे अधिकार संचालक मंडळाला देण्यात येतील असे एका 'जी आर' द्वारे सांगण्यात आले आहे.

मराठा समाजाने आत्ताच याबाबत समाधानी न होता, नेमकं कोणाच्या सांगण्यावरून सारथी बंद करण्याचा घाट घातला गेला? याची शहानिशा करून घेतली पाहिजे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने असलेली आणि मराठा समाजाला दिशा देणारी ही संस्था ठप्प केली गेली. विविध प्रकारचे आरोप करून तिला बदनाम केले गेले. मराठा समाजाचे अमूल्य असे एक ते दीड वर्ष अक्षरशः वाया घालवले.

भ्रष्टाचार आणि तत्सम आरोप सिद्ध तरी करा किंवा जाणीवपूर्वक षडयंत्र रचणाऱ्या मंत्रालयीन अधिकाऱ्याला सस्पेंड तरी करा अशी मागणी या निमित्ताने समाजाच्या वतीने आम्ही करतो आहोत. अशी मागणी खासदार संभाजीराजे यांनी केली आहे.

त्यामुळे सरकारवरचा दबाव वाढला असून संभाजीराजेंचं आक्रमक धोरण कायम राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

First published:

Tags: Maratha reservation, Sambhajiraje chhatrapati