सुषमाजींनी 2004 मध्ये आईसाठी भाषण केलं आणि लातूरमध्ये फुललं कमळ

खरं तर लातूर जिल्ह्यात सुषमा स्वराज यांच्यामुळेच भाजपला यश मिळालं! सुषमाजींनी माझ्या आईसाठी 2004 मध्ये भाषण केलं आणि तिथूनच लातूर जिल्ह्याच्या राजकारणात भाजपचा शिरकाव झाला.

News18 Lokmat | Updated On: Aug 8, 2019 05:25 PM IST

सुषमाजींनी 2004 मध्ये आईसाठी भाषण केलं आणि लातूरमध्ये फुललं कमळ

नितीन बनसोडे, (प्रतिनिधी)

लातुर, 8 ऑगस्ट- खरं तर लातूर जिल्ह्यात सुषमा स्वराज यांच्यामुळेच भाजपला यश मिळालं! सुषमाजींनी माझ्या आईसाठी 2004 मध्ये भाषण केलं आणि तिथूनच लातूर जिल्ह्याच्या राजकारणात भाजपचा शिरकाव झाला. आज मातेचं नेतृत्त्व हरपलं, अशा भावना व्यक्त करून पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी सुषमाजींच्या आठवणी जागवल्या आहेत.

लातूर जिल्हा हा तसा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा, मात्र 2004 नंतर सुषमाजींच्या विनिंग सभेमुळं पहिल्यांदा लातूरचा बालेकिल्ला माझ्या आईच्या नेतृत्त्वात भाजपने जिंकला. आणि तेथूनच भाजपची लातूर जिल्ह्यात भरभराट झाली. त्यामुळे आज मातृत्त्वाचं आमचं एक नेतृत्त्व हरपलं असल्याची भावना लातूरचे पालकमंत्री व राज्याचे अन्न पुरवठा मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केली आहे. आमच्यासाठी आणि भाजपसाठी हा एक खूप मोठा धक्का आहे. सुषमाजींचं लातूर जिल्ह्यावरचं असलेलं प्रेम आणि आपुलकीचं नातं आम्ही कधीच विसरू शकणार नाही, अशा शब्दात संभाजी पाटील यांनी सुषमाजींना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

कार्डिअॅक अरेस्टने सुषमा स्वराज यांचं झालं निधन, जाणून घ्या याची लक्षणं

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी (6 ऑगस्ट) रात्री अखेरचा श्वास घेतला. कार्डिअॅक अरेस्टनंतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. 70 मिनिटं त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. अनेकजण हार्टअटॅकला कार्डिअॅक अरेस्ट समजतात. पण या दोन्हींमध्ये फरक आहे. कार्डिअॅक अरेस्ट म्हणजे काय आणि त्याची लक्षणं कोणती याबद्दल जाणून घेऊ...

Loading...

कार्डिअॅक अरेस्ट म्हणजे हार्टअटॅक येण्यासारखं किंवा हार्ट फेल होण्यासारखं नाही. हृदयात होणाऱ्या गडबडीमुळे हृदयाच्या ठोक्यांवर याचा परिणाम होतो. यामुळे शरीराच्या अनेक भागांमध्ये रक्तपुरवठा होत नाही आणि मेंदूला होणारा ऑक्सिजन आणि रक्त पुरवठा पूर्णपणे थांबतो. तेव्हा व्यक्ती बेशुद्ध होतो. यालाच कार्डिअॅक अरेस्ट असं म्हणतात, कारण बेशुद्ध झाल्यानंतर काही काळात व्यक्तिचा मृत्यूही होऊ शकतो.

कार्डिअॅक अरेस्टची लक्षणं..

-कार्डिअॅक अरेस्टमध्ये रुग्ण दीर्घ श्वास घेऊ शकत नाही.

-कार्डिअॅक अरेस्टच्या स्थितीत हृदयात असह्य वेदना जाणवू लागतात, ज्यांना सहन करणं जवळपास अशक्य असतं.

-कार्डिअॅक अरेस्टच्या आधी थकव्यासारखंही वाटतं.

-अचानक हृदयाचे ठोके वाढतात.

-चक्कर येते.

-शुद्ध हरपते.

यामुळे वाढतो कार्डिअॅक अरेस्टचा धोका..

-धूम्रपान

-कोलेस्ट्रॉल

-हाय ब्लडप्रेशर आमि हायपर टेंशन

-मधुमेह

-नियमितपणे व्यायाम किंवा योग न करणं

या उपायांनी कार्डिअॅक अरेस्टपासून वाचू शकतो..

-फास्ट फूड खाण्यावर पूर्णपणे नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे.

-कार्डिअॅक अरेस्टपासून वाचण्यासाठी नियमितपणे संपूर्ण शरीराची चाचणी करत राहणं आवश्यक आहे.

आधी बचावकार्य नंतर पॅकेजचं बघू, मुख्यमंत्र्यांची UNCUT पत्रकार परिषद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 8, 2019 05:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...