Home /News /maharashtra /

पवार यांच्या विधानावर काय म्हणाले सुशिलकुमार शिंदे?

पवार यांच्या विधानावर काय म्हणाले सुशिलकुमार शिंदे?

राष्ट्रवादीचे नेते तारीक अन्वर यांनी पक्षाचा दिलेला राजीनामा हा त्यांचा वैयक्तिक विचार असून शरद पवारांवर नाराज होवून पक्ष सोडल्याची बातमी कदाचित चुकीची असल्याचं सुशिलकुमार शिंदे म्हणाले.

    शिर्डी, 28 सप्टेंबर : राष्ट्रवादीचे नेते तारीक अन्वर यांनी पक्षाचा दिलेला राजीनामा हा त्यांचा वैयक्तिक विचार असून शरद पवारांवर नाराज होवून पक्ष सोडल्याची बातमी कदाचित चुकीची असल्याचं सुशिलकुमार शिंदे म्हणाले. ते आज अहमदनगरच्या श्रीरामपूर येथील बाजार समीतीत विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यासाठी आले होते. राफेल प्रकारणावरून सध्या मोठे रणकंदन सुरू आहे त्यातच शरद पवारांनी मोदिंचं केलेलं समर्थन आणी त्यानंतर राष्ट्रवादीचे तारीक अन्वर यांचा राजीनामा यामुळे विरोधी पक्षामध्ये खळबळ उडाली आहे. तारीक अन्वर यांचा राजीनामा हा त्यांचा वैयक्तिक विचार असून शरद पवारांवर नाराज होवून पक्ष सोडल्याची बातमी कदाचित चुकीची असल्याचं सुशिलकुमार शिंदे यांनी म्हणटलय तर पवारांची राजकिय भुमिका वेगळी असते का? या प्रश्नावर मात्र शिन्दे यांनी बोलण्याचं टाळलंय. काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते आज अहमदनगरच्या श्रीरामपूर बाजार समीतीत विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी हर्षवर्धन पाटील, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. आज राज्यातील शेतकरी आणी सामान्य जनता सरकारच्या कारभाराला वैतागली आहे, त्यात फडणविसांवर पांडूरंगही रूसला असल्याचं हर्षवर्धन पाटील म्हणाले. BIGG Boss 12: जसलीनला सर्व स्पर्धकांसमोर बिकीनीमध्ये पाहून अनुप जलोटांनी दिली ही प्रतिक्रिया
    First published:

    Tags: Ahmadnagar, Harshvardhan patil, Sharad pawar, Srirampur, Sushilkumar shinde, Tarikh anwar

    पुढील बातम्या