मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सुशीलकुमारांची जुनी खदखद, प्रणितींची दांडी, महाराष्ट्राच्या दुसऱ्या 'शिंदें'च्या मनात काय?

सुशीलकुमारांची जुनी खदखद, प्रणितींची दांडी, महाराष्ट्राच्या दुसऱ्या 'शिंदें'च्या मनात काय?

Sushilkumar Shinde Praniti Shinde

Sushilkumar Shinde Praniti Shinde

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांची जुनी खदखद बोलून दाखवली आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांच्या जुन्या जखमेची खपली आताच का काढली? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे.

    सोलापूर, 19 सप्टेंबर: महाराष्ट्राचं सत्तानाट्य होऊन तीन महिन्यांचा काळ होत नाही तोच काँग्रेसमधली अंतगर्त धुसफूस पुन्हा समोर आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांची जुनी खदखद बोलून दाखवली आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांच्या जुन्या जखमेची खपली आताच का काढली? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे. सोलापुरातल्या एका कार्यक्रमात बोलताना सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्याला मुख्यमंत्रीपदावरून कसं काढण्यात आलं, याचा इतिहास सांगितला. 'यांना माहिती आहे आतलं कारस्थान. कसं मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरून काढलं आणि राज्यपाल म्हणून आंध्रला पाठवलं, पण नंतर मी दिल्लीच्या मंत्रिमंडळात गेलो. त्यांना जो पराभव पत्करावा लागला तो अजूनपर्यंत आहे', असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले. सुशीलकुमार शिंदे यांच्या या वक्तव्याचं हे टायमिंग अनेकांसाठी भुवया उंचावणारं आहे. आजच मुंबईमध्ये काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडली. राहुल गांधींनी राष्ट्रीय अध्यक्ष व्हावं, तसंच प्रदेशाध्यक्ष आणि प्रदेश कार्यकारिणी निवडण्याचा अधिकार काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना देण्यात यावा, हे ते दोन ठराव या बैठकीत मंजूर करून घेण्यात आले. मात्र या बैठकीला सुशीलकुमार शिंदे गैरहजर होते. सुशीलकुमार शिंदे यांच्यासोबत काँग्रेसच्या इतर काही नेत्यांनीही या बैठकीला दांडी मारली. काँग्रेसच्या आजच्या बैठकीला सुशीलकुमार शिंदे, अमित देशमुख, धीरज देशमुख, वर्षा गायकवाड, नितीन राऊत, सतेज पाटील, केसी पाडवी, यशोमती ठाकूर, संग्राम थोपटे, विक्रम सावंत, रणजित कांबळे अनुपस्थित होते. दरम्यान नेत्यांच्या गैरहजेरीबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. नागपूरहून येणारं विमान रद्द झालं. अमित देशमुख परदेशात आहेत, तर संग्राम थोपटे यांची तब्येत खराब आहे. सुशील कुमार शिंदे यांनी कळवलं होतं, असं नाना पटोले म्हणाले.
    प्रणिती शिंदेंची दांडी एकीकडे खदखद बोलून दाखवणाऱ्या सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेसच्या बैठकीला दांडी मारली, तर सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे या एकनाथ शिंदे सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावेळी गैरहजर राहिलेल्या आमदारांपैकी एक होत्या. सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांच्या गैरहजेरीमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. विश्वासदर्शक ठरावावेळी गैरहजर आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या विश्वासदर्शक ठरावावेळी काँग्रेसचे 11 आमदार विधिमंडळात उशीरा पोहोचले, त्यामुळे त्यांना मतदानामध्ये सहभागी होता आलं नाही. काँग्रेसच्या या आमदारांमध्ये अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, धीरज देशमुख, प्रणिती शिंदे, जितेश अंतापूरकर, झिशान सिद्दीकी, राजू आवळे, मोहन हंबर्डे, कुणाल पाटील, माधवराव जवळगावकर आणि शिरिष चौधरी यांचा समावेश होता. यापैकी अशोक चव्हाण हे नाराज असून ते लवकरच काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चाही जोरात सुरू आहेत.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या