मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

प्रणिती यांच्या मंत्रिपदासाठी सुशीलकुमार शिंदेंनी आमदाराला पाडले, माजी मंत्र्याचा गौप्यस्फोट

प्रणिती यांच्या मंत्रिपदासाठी सुशीलकुमार शिंदेंनी आमदाराला पाडले, माजी मंत्र्याचा गौप्यस्फोट

आपल्या विरोधात उमेदवार कोण असावा हे देखील सुशीलकुमार शिंदेच ठरवत आले आहेत. परंतु राज्य मंत्रिमंडळात मंत्री होण्यासाठी आपल्या मुलीला अडचण होऊ नये म्हणून ….

आपल्या विरोधात उमेदवार कोण असावा हे देखील सुशीलकुमार शिंदेच ठरवत आले आहेत. परंतु राज्य मंत्रिमंडळात मंत्री होण्यासाठी आपल्या मुलीला अडचण होऊ नये म्हणून ….

आपल्या विरोधात उमेदवार कोण असावा हे देखील सुशीलकुमार शिंदेच ठरवत आले आहेत. परंतु राज्य मंत्रिमंडळात मंत्री होण्यासाठी आपल्या मुलीला अडचण होऊ नये म्हणून ….

सोलापूर, 02 ॲागस्ट : राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून (ncp) भाजपवासी झालेल्या लक्ष्मण ढोबळेंनी (lakshman dhoble) आरोपांच्या फैरी अद्यापही सुरूच ठेवल्या आहेत. सोलापूर (solapur) जिल्ह्यातील कॉंग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar shinde) यांच्यावरच निशाना साधला आहे. ‘आपल्या मुलीला म्हणजेच आमदार आमदार प्रणिती शिंदे (praniti shinde) यांना मंत्रिमंडळात अडचण निर्माण होऊ नये म्हणून सुशीलकुमार शिंदे यांनीच अक्कलकोटचे कॉंग्रेसचे माजी आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना निवडणुकीत पाडल्याचा गौप्यस्फोट केला आहे.

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भाजप नगरसेवक सुनील कामाठी यांच्या प्रभागात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. या भूमिपूजनावेळी लक्ष्मणराव ढोबळे यांनी हा गौप्यस्फोट केला. यावेळी भाजप आमदार विजयकुमार देशमुख, आण्णाभाऊ साठे यांची सून सावित्रीबाई साठे, महापौर श्रीकांचना यन्नम, नगरसेवक सुनील कामाठी आदी नेते उपस्थित होते.

लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले की, ‘काही दिवसांपूर्वी आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात स्मार्टसिटीच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार झाला. तसंच आता शहर उत्तर मतदारसंघात आम्ही लक्ष घालणार आहोत. मात्र ताई माझे तुम्हाला आव्हान आहे की, तुम्ही शहर उत्तर मधून विधानसभा निवडणूक लढवून दाखवा. एकदा लढाई होऊन जाऊद्या. उगाच नुरा कुस्ती करणाऱ्यांनी राजकारणावर बोलू नये.’

‘आपल्या विरोधात उमेदवार कोण असावा हे देखील सुशीलकुमार शिंदेच ठरवत आले आहेत. परंतु राज्य मंत्रिमंडळात मंत्री होण्यासाठी आपल्या मुलीला अडचण होऊ नये म्हणून म्हेत्रेंना पाडण्याचे काम सुशीलकुमार शिंदे यांनीच केले आहे.’ असा खुलासाही ढोबळे यांनी केला.

त्याचबरोबर दुहेरी जलवाहिनीवरुनही लक्ष्मणराव ढोबळेंनी आमदार प्रणिती शिंदेंवर निशाना साधला.’ पाण्याच्या प्रश्नावर बोलण्याचा अधिकार तुम्हाला जरुर आहे मात्र दुहेरी जलवाहिनीवर तुम्ही बोलू नये. ते काम आम्ही नक्की करुन दाखवू. तुम्ही एकदा वाढपी बदलून बघा.’ असा टोलाही त्यांनी लगावला.

दरम्यान,कॉंग्रेसने देखील या वक्तव्यावर ढोबळे यांचा चांगलाच समाचार घेतलाय. ‘लक्ष्मण ढोबळे यांच्या वक्तव्यात फार दम नसून, जर सुशीलकुमार शिंदेंनी माजी आमदार म्हेत्रे यांना पाडले असते तर आज सरकार येवून १८ महिने झाले मग प्रणिती शिंदे मंत्री का झाल्या नाहीत. त्यामुळे ढोबळेंनी पक्षप्रवेश करून दोन वर्षे लोटली. मात्र त्यांना भाजपमध्ये कोणीच विचारत नाहीत. केवळ सोलापुरच्या खासदारकीवर डोळा ठेवून चापलुसी करण्याचा ढोबळेंची स्वभाव असल्याने त्यांच्या वक्तव्याला फारसे महत्व देत नसल्याची प्रतिक्रिया सोलापूर कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी दिली. त्यामुळे कॉंग्रेस विरूध्द ढोबळे असा संघर्ष भविष्यात पाहायला मिळू शकतो.

First published:

Tags: Congress, Solapur