Home /News /maharashtra /

या 'पाच' कारणांमुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुशिलकुमार शिंदे !

या 'पाच' कारणांमुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुशिलकुमार शिंदे !

Sushilkumar Shinde यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड होणार अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

    मुंबई, 30 जून : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर नव्या काँग्रेस अध्यक्षपदाबाबत सुरू झालेली चर्चा आता निर्णायक टप्प्यावर आली आहे. कारण, गांधी घराण्याकडून अध्यक्षपदासाठी महाराष्ट्रातील काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे, अशी माहिती आहे. पण अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. सुशीलकुमार शिंदे हेच जर काँग्रेसचे अध्यक्ष झाले तर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच कोणीतरी मराठी व्यक्ती या पदावर बसणार आहे. शिवाय, अनेक राजकीय गणितांची आकडेमोड करत सुशिलकुमार शिंदे यांची निवड ही काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी होऊ शकते. राज्यातील विधानसभा निवडणुका राज्यात ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. महत्त्वाच्या आणि मोठ्या राज्यांपैकी महाराष्ट्र हे एक राज्य आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात काँग्रेसला दारूण पराभवाचा सामना करावा लागला होता. लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुका होत असल्यानं राज्यात मिळालेला विजय हा काँग्रेससाठी महत्त्वपूर्ण आणि उभारी देणारा ठरेल. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपदी मराठी व्यक्तीची होणारी निवड काँग्रेसला राजकीय दृष्ट्या फायदेशीर असणार आहे. ‘वंचित’मुळे काँग्रेस नेत्यांवर भडकले राहुल गांधी; नेत्यांना विचारला हा प्रश्न! दलित मतांचं राजकारण लोकसभा निवडणुकीत दलित मतं ही वंचित बहुजन आघाडीकडे वळली होती. त्यामुळे आघाडीला फटका बसला होता. सुशिलकुमार शिंदे यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला होता. पण, आता राज्यातील दलित नेता अध्यक्षपदी आल्यास दलित मतं काँग्रेसकडे वळण्याची शक्यता आहे. गांधी घराण्याच्या जवळचे सुशिलकुमार शिंदे हे गांधी घराण्याच्या जवळचे आणि विश्वासातले नेते आहेत. त्यामुळे ही बाब देखील काँग्रेसच्या पथ्यावरील आहे. देशावर गंभीर पाणीसंकट ! 2020 पर्यंत या शहरांमधील पाणी संपणार ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे हे ज्येष्ठ आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नेत्यांना डावललं गेलं असं देखील म्हणता येणार नाही. अनुभव सुशिलकुमार शिंदे यांना राजकारणाचा अनुभव देखील दांडगा आहे. त्यांनी केंद्रीय गृहमंत्रीपदाची जबाबदारी देखील सांभाळली आहे. त्याचा फायदा देखील काँग्रेसला होऊ शकतो. महिला वन अधिकारी आणि पोलिसांवर लाठा-काठ्यांनी हल्ला, VIDEO व्हायरल
    Published by:ram deshpande
    First published:

    Tags: Congress, Rahul gandhi, Sushilkumar shinde

    पुढील बातम्या