मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'...म्हणून आईने माझे नाव दगडू ठेवले', सुशीलकुमार शिंदे आणि सुभाष देशमुख यांची दिलखुलास मुलाखत

'...म्हणून आईने माझे नाव दगडू ठेवले', सुशीलकुमार शिंदे आणि सुभाष देशमुख यांची दिलखुलास मुलाखत

सुशीलकुमार शिंदे आणि  सुभाष देशमुख यांनी दिलखुलास उत्तरे देत सोलापूरकरांची मनं जिंकली.

सुशीलकुमार शिंदे आणि सुभाष देशमुख यांनी दिलखुलास उत्तरे देत सोलापूरकरांची मनं जिंकली.

सुशीलकुमार शिंदे आणि सुभाष देशमुख यांनी दिलखुलास उत्तरे देत सोलापूरकरांची मनं जिंकली.

सोलापूर, 15 मार्च : महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर शाखेतर्फे आयोजित 'सोलापूर रंगे, नेत्यांच्या संगे' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि भाजप नेते सुभाष देशमुख यांनी मुलाखतकार विवेक घळसासी यांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे देत सोलापूरकरांची मनं जिंकली. प्रश्न : - सुशीलकुमार हे नाव कसे आणि का ठेवले ? सुशीलकुमार शिंदे : - प्रेमा तुझा रंग कसा या नाटकात मी काम होतो. त्यातूनच पुढे दगडू नावावरून पुढे सुशीलकुमार झालो. - लहानपणीचे नाव ज्ञानोबा होते पण मुल जगत नसल्याने आईने माझे नाव दगडू ठेवले. - एका प्रसिद्ध वकिलांचे नाव सुशील होते. मी पट्टेवाला असताना मग मी माझे नाव सुशीलकुमार ठेवले. - रिस्क घेतल्याशिवाय आणि बाहेर पडल्याशिवाय सोलापूरकर प्रगती करत नाहीत. - इमरजन्सी जॉब योजनेमधून 6 डिसेंबर 1965 ला माझे PSI म्हणून नोकरी मिळाली. - 1969 ला LLB झालो ते माझे स्वप्न होते. - देवाच्या पायावर डोके ठेवणे हे नाटकाचा भाग असतो. - लेबर केसेस चालवण्याचा प्रयत्न केला. - 1985 सालापर्यंत राजकीय सौहार्द होता. संकुचित वृत्तीने आम्ही राजकीय मंडळी आपापले गट बनवायला लागलो. यामध्ये राष्ट्रीयत्व बाजूला राहिले. - अटलबिहारी वाजपेयी हे मोठे नेते होते. आम्ही विरोधकांनी मोदी सरकार बरखास्त करण्याची मागणी केली होती. त्यावर अटलजी राजधर्म निभाना चाहिए असे म्हणाले होते. त्यावर आडवाणी म्हणाले मोदी का क्या दोष है? हल्ली अटलजी सारखे नेते दुर्मिळ झालेत. - मी अटलबिहारी वाजपेयी यांचे रेल्वे स्टेशनवर स्वागत केले होते. - मुरलीमनोहर जोशी यांच्याकडचा किस्सा. - त्यांच्याकडे रंगपंचमीच्या कार्यक्रमाला जायचो. एकदा उशिरा गेलो होतो. तेव्हा ते म्हणाले, आले आले कॉंग्रेसमधले सावरकरॉईट आले... - बाळासाहेब देवरस यांच्यासोबत 1985 ला मी नागपूरमधील स्वा. सावरकरांच्या स्मारकाचे उद्घाटन केले होते. - याविरोधात तत्कालीन खसदारांनी वरिष्ठाकडे तक्रार केली होती. - त्याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी मी इंदिराजी यांच्याकडे गेलो. तेव्हा त्यांनीही त्या कार्यक्रमाबाबतचे कौतुक केले. - सावरकर हे सोशल रिफॉर्मर होते. त्यामुळे त्यांचे सामाजिक सुधरणेतील योगदान मोठे होते. प्रश्न : एक चिमणी भारी कशी पडली...? - 2012 साली बोरामणी विमानतळ मंजूर होऊन जागा हस्तातरीत केली. - 2013 साली एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियासोबत महाराष्ट्र सरकारशी करार केला होता. - बोरामणी विमानतळासाठी 5 वर्षात मी मुद्दाम प्रयत्न केला नाही. कारण मोदी सरकारमधील लोक सकारात्मक देतील की नाही याबाबत साशंक होतो. - बडवे म्हंटले की पांडुरंगाच्या पायावर डोकं बडवणारे असेच वाटते. - मी माझ्या तिनही मुलींना समान मानतो. - मातृ देवो भव, पितृ देवो भव ही आपली संस्कृती आहे. मात्र आजची पिढी याबाबत उदासीन आहे. त्यांच्या वर्तनाकडे पाहून वाईट वाटते. प्रश्न : विरंगुळ्यासाठी आपण काय करता? - मी साहित्यात रमतो, काव्यवाचनाच्या कार्यक्रमाला जातो, तरुणांशी चर्चा करतो. - गर्दी ही पोकळ असते आपण आपल्या खऱ्या मित्रांशी हितगुज करणे गरजेचे असते. - वेगवेगळ्या पक्षांना एकत्र कसे आणता येईल याबाबत विचार करावा लागेल. - मला वाटते की आपले राष्ट्र एकत्र राहील की नाही याबाबत चिंता वाटते. सर्व प्रांत वेगवेगळे होतील की काय असे वाटते. - हे बदलवण्याची जबाबदारी माध्यमांची आहे. - सुभाष देशमुखांकडून काही शिकावे असे माझे वय राहिले नाही. पण त्यांच्या सांस्कृतिक कार्याचे कौतुक करतो. - सोलापूरला राहायला आवडते आणि मुंबई कर्मभूमी - संघटनात्मक कार्य आवडते. पण मला निवृत्त व्हावे असे वाटते. सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या नेहमच्या स्टाईलमध्ये सर्व प्रश्नांना दिलखुलास उत्तर देत केलेल्या फटकेबाजीनंतर वेळ होती भाजप आमदार आणि माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची.. मुलाखतीत काय म्हणाले सुभाष देशमुख - मी तर सुशीलकुमार शिंदे यांच्यापेक्षा गरिबीतून पुढे आलो. - आमदार कमल विचारे यांच्या बदलापूर येथील पोल्ट्री फॉर्मवर मजूर म्हणून काम केले. - जोतिराम गायकवाड हे माझे शिक्षक होते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे सिध्देश्वर कारखान्यावर चिटबॉयच्या हाताखाली काम केले. - सुरवातीला सुपरवायझर म्हणून काम सुरु केले त्यानंतर खासगी काम घ्यायला सुरुवात केली. - खासदार लिंगराज वल्याळ, संघचालक शांतीलाल जैन यांनी मला राजकारणात आणले. त्यानंतर विधान परिषदेची निवडणूक लढवली. - एकमेकांचे उट्टे काढण्याच्या वृत्तीमुळे ग्रामीण भागाचा विकास खुंटला. - हे टाळण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींना मी व्यक्तीगत पातळीवरुन कपाट भेट दिले. - 2009 नंतरही मी शरद पवार साहेबांना भेटायला जायचो. - दिल्लीत त्यांनी मला गाडीत बसवून 40 मिनिटे मनसोक्त गप्पा मारल्या. - निवडणूक झाल्यावर समाज आणि राष्ट्र हे केंद्रस्थानी मानले पाहिजे. - सुशीलकुमार शिंदे यांना भेटल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांचा कॉल आला. प्रश्न : एक चिमणी भारी कशी पडली...? - चिमणी पाडण्याचे काम मी केले आहे, अशी अफवा पसरवली होती. त्यानंतर मी धर्मराज काडादी यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. - दोन्ही देखमुखात काहीही वाद नाहीत. पत्रकारांच्या बातम्यामुळे तशी प्रतिमा झालीय. आम्ही दोघेही अबोल आहोत. प्रणिती शिंदे यांचा देशमुखांना प्रश्न तुम्हाला तुमच्यातील उद्योजक आवडतो की राज्यकर्ता जास्त आवडतो? - मी व्यवसायात आसतो तर मी खूप श्रीमंत झालो असतो. - आई वडिलांचे संस्कारातून मी समाजकारणासाठी राजकारण करतो. - सोलापूर महापालिकेच्या कारभारावर आपण समाधानी नाही. - समस्येला न्याय देण्याचेव भूमिका सातत्याने करावी लागणार आहे. - मी लहानपणी एका झव्हेरी समाजाच्या महिलेच्या टोपलीतील साहित्याची चोरी केली आणि ते सामान विकले होते. - हे घरी कळल्यावर मला सावत्र आईने मला खूप मारले आणि देवासमोर नाक घासायला लावले. - दिलखुलास हसणे हे शिंदे साहेबांकडून शिकले पाहिजे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Sushilkumar shinde

पुढील बातम्या