गौरव आर्यासोबत कोट्यवधींचा गुंतवणूक, कर्नाटकच्या आमदाराला ED चा समन्स

गौरव आर्यासोबत कोट्यवधींचा गुंतवणूक, कर्नाटकच्या आमदाराला ED चा समन्स

बॉलिवूड अभितेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी दिवसेंदिवस नवनवीन माहिती उजेडात येत आहे.

  • Share this:

मुंबई, 1 सप्टेंबर: बॉलिवूड अभितेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी दिवसेंदिवस नवनवीन माहिती उजेडात येत आहे. प्रकरणाचा तपास पुढे सरकत असताना बड्या राजकारणांची नावे समोर येत आहेत. संशयीत अंमली पदार्थ तस्कर आणि गोव्यातील हॉटेल व्यावसायिक गौरव आर्यासोबत कर्नाटकच्या एका आमदारानं कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. अंमलबजावणी संचालनालयानं (ED)कर्नाटकच्या आमदाराला समन्य बजावले आहेत. आता या आमदाराला ED समोर चौकशीला हजर राहावं लागणार आहे.

हेही वाचा... 'हा काय तमाशा आहे' मुंबई पोलिसांची भीती वाटते tweet वर संतापले राऊत

सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्यासोबत व्हॉट्सअॅप चॅट करणारा अंमली पदार्थ तस्कर गौरव आर्या सध्या चर्चेत आहे. मुंबईत ED कडून आर्याची चौकशी सुरू आहे. गौरव आर्या मंगळवारी दुसऱ्या दिवशी चौकशीला ED कार्यालयात हजर झाला आहे. काल, रिया चक्रवर्तीबाबत आर्याची चौकशी करण्यात आली. रियाची व्हॉट्सअॅप चॅट झाल्याची माहिती आर्यानं दिली. मात्र, रिया हिनं डग्सबाबत आपल्या कोणताही प्रतिसाद दिला नसल्याचंही त्यानं सांगितलं.

कर्नाटकच्या आमदाराची मोठी गुंतवणूक...

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव आर्याचे गोवा येथे ‘द टमरिण्ड’ नावाचे मोठे हॉटेल आहे. यात कर्नाटकमधील एका आमदाराची भागीदार आहे. गौरव आर्या आणि कर्नाटकमधील आमदाराची अनेक व्यवसायात संयुक्त गुंतवणूक आहे. एवढंच नाही तर त्यांचा दुबईत देखील मोठा व्यवसाय आहे. तर कर्नाटकातील आमदार, गौरव आर्या आणि यांच्यासोबत आणखी एका व्यक्तीने मिळून कॅनडा येथे क्रिकेट फ्रेन्चायसी विकत घेतली आहे. या सर्व व्यवहारात कोटींची उलाढाल झाली आहे. अल्पावधीतच व्यावसायिक क्षेत्रात घेतलेल्या उत्तुंग भरारीची चौकशी करण्याकरता गौरव आर्याची ED कडून चौकशी सुरू आहे. गौरव आर्याच्या चौकशी कर्नाटकातील राजकीय नेत्याचं नाव समोर आल्यानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

हेही वाचा...सुशांत सिंह राजपूत प्रकरणात रियाला अटक करणं CBI साठी नाही सोपं; कारणं पाहा

रियासह अनेक बॉलिवूडकरांची चिंता वाढणार...

संशयीत अंमली पदार्थ तस्कर गौरव आर्या याची चौकशी सुरू झाल्यानं रियासह अनेक बॉलिवूडकरांची चिंता वाढणार आहे. EDने बजावलेल्या समन्सनंतर गौरव आर्या मुंबईत चौकशीला हजर झाला आहे. रिया आणि गौरवमधील अंमली पदार्थांबाबत व्हाॅटसप चॅटचा खुलासा झाल्यानंतर ईडीने त्या संदर्भात NCBला निर्देश देत गुन्हा दाखल केला होता. मात्र, तरीही गौरव आर्याला प्रथम इडी चौकशीला हजर राहावे लागले. कारण फक्त अंमली तस्करीशी नाही तर क्रिकेट फ्रेन्चायसी घेण्यापासून ते कमी वेळात मोठी गुंतवणूक करणारा उद्योगपती म्हणून देखील गौरव आर्याची चौकशी सुरू आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: September 1, 2020, 1:04 PM IST

ताज्या बातम्या