नितीन नांदुरकर (जळगाव), 03 नोव्हेंबर : खायला आता नाही मात्र सरफिंगला डाटा आहे. नरेंद्र मोदी दोन करोड मुलांना नोकरी देणार होते मात्र आता म्हणतात नोकरी नाही मिळाली तर चहा पकोडेची दुकान टाका. नरेंद्र मोदी यांनी चहा विकायचा आम्ही पकोडे तळायचे जर हेच करायचे होते तर मेडिकल व इंजिनिअरिंगसाठी लाखो रुपयांची फी का घेतली असा सवाल उपस्थित करत सुषमा अंधारे यांनी नरेंद्र मोदी यांची मिमिक्री करून मोदींवर टीका केली आहे. त्या महाप्रबोधन यात्रेत बोलत होत्या. तसंच, वाय प्लस सुरक्षा कोणाच्या भीतीपोटी दिली? असं म्हणत पहिल्यांदाच अंधारे यांनी अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली.
त्या पुढे म्हणाल्या की, हर घर तिरंगा या मोहिमेच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी प्लॅस्टिकचा तिरंगा न लावता कपड्याचा तिरंगा लावण्याचे आवाहन केले. आणि कपड्याचा तिरंगा म्हणून त्याचा टेंडर गुजरातच्या लोकांना दिलं आणि तिरंगा आम्हाला विकत घ्यायला लावला आणि धंदा त्यांनी केला. अशा खरमती टीका अंधारे यांनी केली. याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी यांना वाय प्लस दर्जाची सिक्युरीटी दिल्याने त्यांच्यावरही सुषमा अंधारे यांनी टीका केली.
हे ही वाचा : शरद पवारांना आजही डिस्चार्ज नाही; प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिली मोठी अपडेट
किरीट सोमय्यांचीही मिमीक्री
सभेत ईडी प्रकरणावरुन सुषमा अंधारेंनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, आम्ही आमच्या टिकेवर हिमतीने उत्तर देतो, आम्ही अंधारात गुवाहाटी जात नाही. पाचोऱ्यात अनेक राखीव प्लॉट आहेत, किरीट भाऊ मी कागदपत्र द्यायला तयार आहे. यावर बोलणार का? की तुमच्या गटात आहेत म्हणून बोलणार नाही? असा सवालही त्यांनी विचारला. ईडी प्रकरणावरुन सुषमा अंधारेंनी सोमय्यांची मिमिक्री करत उत्तर दिल्याने सभेत एकच हशा पिकला.
गुलाबराव पाटलांवर सडकून टीका
मंत्री गुलाबराव पाटील आणि शिंदे गटाचेच आमदार चिमणराव पाटील यांच्यात जोरदार वाद सुरू आहे.राष्ट्रवादीच्या नेत्याला आपल्याच मतदारसंघात निधी दिल्याने चिमणराव पाटील नाराज आहे.हा वाद सुरू असतानाच आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उडी घेतली आहे.चिमणराव आबा, म्हातारपणात तुम्ही गद्दारीचा डाग का लावून घेतला?असा सवालच सुषमा अंधारे यांनी चिमणराव यांना करून डिवचले आहे.
हे ही वाचा : टिकलीवरुन राजकारण! 'परंपरेच्या बाजारात अक्कल आम्ही विकली..'; सुप्रिया सुळेंचा भिडेंवर निशाणा
चिमणराव पाटील मला माझ्या आजोबासारखे आहेत. मात्र, गुवाहाटीत त्यांचं चिरतारुण्य दिसलं.चिमणराव पाटील तुम्हाला लोक म्हणतील कसं काय पाटील बरं आहे का? गुवाहाटीला गेले ते खरं आहे का?असा चिमटाही त्यांनी यावेळी काढत शिंदे आणि फडणवीस सरकारला टोला लगावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gulabrao patil, Jalgaon, Shiv Sena (Political Party), Uddhav Thackeray (Politician)