मुंबई, 28 मार्च : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आमदार संजय शिरसाट अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक पोलीस ठाण्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांच्या विरुद्ध तक्रार दिली आहे. या तक्रारीमध्ये सुषमा अंधारे यांच्याबद्दल स्त्री मनाला लज्जा उत्पन्न होईल अशा शब्दाचा वापर करणाऱ्या आमदार शिरसाट यांच्यावर कलम 354 (अ), 509 500 प्रमाणे गुन्हा दाखल करावा अशी मागणी यांनी केली आहे. हा तक्रार अर्ज क्रांती चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकाकडे दिला आहे. आता पोलीस याबाबत तपास करून पुढील कारवाई करणार आहेत.
छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या शिवसेनेच्या सभेत सुषमा अंधारे यांच्याबाबत संजय शिरसाट यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. सुषमा अंधारे या सर्वांनाच भाऊ म्हणतात, पण त्या बाईने काय काय लफडी केली तिलाच माहिती असं आमदार शिरसाट म्हणाले होते. आता त्यांना हे वक्तव्य भोवण्याची शक्यता आहे. सुषमा अंधारे यांनी महिला आयोगाकडेही याबाबत तक्रार दाखल केली आहे. याची माहिती त्यांनी ट्विटरवरून दिलीय.
संभाजीराजेंनी केली पोलखोल, आरोग्य मंत्र्यांवर गंभीर आरोप करत केला Video Viral
सुषमा अंधारे यांनी म्हटलं की, संजय शिरसाट या विकृत आमदाराने वापरलेली ही भाषा व्यक्तीश: मलाच नाही तर एकूणच महिला वर्गाच्या मनात लज्जा उत्पन्न करणारी आहे. तसंच बहीण-भावाच्या पवित्र नात्याला कलंक लावणारी असल्याचंही त्या म्हणाले. या प्रकऱणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून न घेतल्यानं महिला आयोगाकडे तक्रार केल्याचं त्या म्हणाल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shivsena