मुंबईतल्या ट्राफिक जॅमचा प्रभूंना फटका, कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी करावी लागली पायपीट

मुंबईतल्या ट्राफिक जॅमचा प्रभूंना फटका, कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी करावी लागली पायपीट

मंत्रिमहोदयच ट्राफिक जॅममध्ये अडकल्याने साडे सहाला सुरू होणारा कार्यक्रम दीड सात उशीराने सुरू झाला.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई 25 डिसेंबर : ट्राफिक जॅम मुंबईकरांसाठी आता काही नवं नाही. ऑफिस संपल्यानंतर घर गाठण्यासाठी त्यांना दररोज काही तास गाडीत बसून काढावे लागतात. लोकांचा अमुल्य वेळ वाया जातो. या ट्राफिक जामचा फटका मंगळवारी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना बसला. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमासाठी त्यांना जायचं होतं मात्र ते वेळेवर पोहोचू शकले नाहीत.

केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू हे तसे मुंबईकर. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचं निमित्त साधून मुंबईतल्या बांद्रे इथल्या रंगशारदा सभागृहात एका कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अटलजींच्या कवितांचं ब्रेलमध्ये भाषांतर करण्यात आलं होतं. त्या कार्यक्रमासाठी सुरेश प्रभू यांना 'रंगशारदा'त जायचे होते.

मात्र प्रभू यांची गाडी ट्राफिकमध्ये अडकली. अर्धातास झाला तरी गाडी काही पुढे सरकेना. कार्यक्रमालाही उशीर होत होता. त्यामुळे सरकारी गाडी सी लिंक जवळ सोडून प्रभूंनी पायीच कार्यक्रमस्थळी जाण्याचा निर्णय घेतला.

आणि तब्बल वीस मिनिटं पायपीट करत त्यांनी रंगशारदा गाठलं तेव्हा रात्री आठ वाजले होते. साडे सहाला सुरू होणारा कार्यक्रम दीड सात उशीराने सुरू झाला. या कार्यक्रमात बोलताना प्रभू यांनी सुरूवातीलाच उशीर झाल्याबद्दल माफी मागितली आणि ट्राफिक जॅमचा किस्सा श्रोत्यांना ऐकवला.

 

VIDEO : पैसे परत कर म्हणत तृतीयपंथियांनी फाडले 'त्याचे' कपडे

First published: December 25, 2018, 9:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading