भाजपचे खासदार दिलीप गांधी यांच्या मुलाची नगरमधून बंडखोरी

भाजपचे खासदार दिलीप गांधी यांच्या मुलाची नगरमधून बंडखोरी

भाजपचे खासदार दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी सुरेंद्र गांधी अपक्ष निवडणूक लढवणार आहेत.

  • Share this:

अहमदनगर, 24 मार्च: भाजपचे खासदार दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी सुरेंद्र गांधी अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. खासदार दिलीप गांधी यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सुरेंद्र गांधी यांनी ही घोषणा केली. भाजपने डॉ.सुजय विखे-पाटील यांना उमेदवारी दिल्याने दिलीप गांधी नाराज होते. आता त्यांच्या मुलाने अपक्ष म्हणून निवडणू्क लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

नगरमधून दिलीप गांधी यांनी सलग ३ वेळा विजय मिळवला आहे. यंदा भाजपने सुजय विखे यांना उमेदवारी दिल्याने विद्यमान खासदार दिलीप गांधी नाराज होते. आज रविवारी झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सुरेंद्र गांधी यांनी निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. विशेष म्हणजे ही घोषणा करत असताना दिलीप गांधी देखील उपस्थित होते.

पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात दिलीप गांधी जानेवारी 2003 ते मार्च 2004 या काळात राज्यमंत्री देखील होते. 2014च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी २ लाखाहून अधिक मताधिक्य घेत विजय मिळवला होता.

लोकसभा निवडणुक 2019

लोकसभा निवडणुकांच्या (LokSabha Elections 2019) तारखा जाहीर झाल्या आहेत. देशभरात सात टप्प्यांमध्ये 11 एप्रिल ते 19 मे यादरम्यान निवडणुका होतील. नवी दिल्लीमध्ये रविवारी निवडणूक आयोगाने (Election Commission) या तारखांची घोषणा केली. देशात सात टप्प्यांत तर महाराष्ट्रात चार टप्प्यांत लोकसभा निवडणुका होतील.

11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात 7 जागांसाठी मतदान होणार-

वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा- गोदिया, गडचिरोली- चिमूड, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम

18 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 10 जागांवर होणार मतदान-

बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर

23 एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 14 जागांवर होणार मतदान

जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदूर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

29 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 17 जागांवर होणार मतदान

नंदूरबार, धुळे दिंडोरी, नाशिक, पालघर, भिंवडी, कल्याण, ठाणे, मुंबई- उत्तर, मुंबई- उत्तर- पश्चिम, मुंबई -उत्तर - पूर्व, मुंबई- उत्तर -मध्य, मुंबई - दक्षिण - मध्य, मुंबई- दक्षिण, मावळ, शिरूर, शिर्डी

लोकसभा निवडणूक 2014

महाराष्ट्रात 2014 च्या निवडणुकीत भाजप - शिवसेना युती आणि काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी अशी सरळ स्पर्धा होती. राज्यातल्या लोकसभेच्या 48 जागांपैकी 41 जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात भाजप- सेना युतीने जिंकल्या आणि काँग्रेस आघाडीचा सपशेल पराभव झाला. काँग्रेसला फक्त 2 जागा जिंकता आल्या तर राष्ट्रवादीने केवळ 4 जागा राखल्या.

महाराष्ट्र 2014 चं पक्षीय बलाबल

एकूण जागा 48

भाजप 23

सेना 18

राष्ट्रवादी काँग्रेस 4

काँग्रेस 2

स्वाभिमानी शेतकरी पक्ष 1

VIDEO: पार्थ पवारांचा अनोखा अंदाज; गाण्यावर धरला ठेका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 24, 2019 03:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading