राष्ट्रवादीचे नगरसेवक सूरज सातव यांचा भरचौकात हवेत गोळीबार

राष्ट्रवादीचे नगरसेवक सूरज सातव यांचा भरचौकात हवेत गोळीबार

बारामतीमध्ये दसऱ्याच्या दिवशी भरचौकात सीमोल्लंघनाच्या नावाखाली रिव्हॉल्वरमधून हवेत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीये.

  • Share this:

बारामती, 13 आॅक्टोबर : बारामतीमध्ये दसऱ्याच्या दिवशी भरचौकात सीमोल्लंघनाच्या नावाखाली रिव्हॉल्वरमधून हवेत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादीच्या नगरसेवक सूरज सातव यांनीच हा गोळीबार केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय.

या घटनेला आठवडा उलटल्यानंतर आता सोशल मीडियावर चर्चा सुरू झालीये. पोलीस मात्र आठवड्यानंतरही या घटनेबाबत कुठलीच माहिती नसल्याचं सांगताहेत. नगरसेवक सूरज सातव यांच्याकडचा परवाना असलेल्या रिव्हॉल्वरमधून या गोळ्या हवेत झाडण्यात आल्यात.

उपस्थितांमध्ये रूबाब दाखवण्यासाठी हा सगळा प्रकार केला गेलाय.मात्र यामुळे दहशत वाढलीये ती वेगळी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 13, 2017 01:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading