मुंबई, 24 डिसेंबर : राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार आणि काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत असलेल्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) या सोशल मीडियावर (Supriya Sule On Fcebook) नेहमी सक्रिय असतात. त्याच्या आयुष्यातील घडलेले क्षण ते जनतेसोबतही आवर्जुन शेअर करतात. बऱ्याचदा जनतेला राजकीय नेत्यांची दुसरी बाजू पाहायला मिळत नाही. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून एका खासदाराव्यतिरिक्त ती व्यक्ती कशी आहे? याबद्दलही माहिती मिळते.
सुप्रिया सुळेंनी आपल्या फेसबुकच्या माध्यमातून शेअर केलेल्या व्हिडीओत (Facebook Live) ते आपल्या मतदारसंघाचा फेरफटका मारत असताना एका फळ विक्रेत्या महिलेसोबत बातचीत करताना दिसत आहे. ही महिला अंजीर, लाल पेरू व पपईंसोबत अनेक भाज्यांची विक्री करताना दिसत आहे. विशेष म्हणजे सुप्रिया सुळे आवर्जुन त्या महिलेला त्याबाबत माहिती विचारत आहे. याशिवाय मोह आवरत नसल्याने त्यांनी पेरुचा आस्वाद घेतला. इतकच नाही तर तेथील महिलांसोबत फोटोसेशनही केलं.
कापूरहोळ या मतदारसंघातील महिलांसोबत सुप्रिया सुळेनी यांनी विचारपूसही केली. येथे विक्रीसाठी असलेले अंजिर, पेरू आणि पपई याचं उत्पादन याचच भागात घेतलं जात असल्याचं विक्रेत्या महिलांनी सांगितलं.
काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांचं नावं मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत होते. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खलबतं सुरू झाली होती. दरम्यान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला. त्यांनी एका वृत्तपत्राला याबाबत दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, सुप्रिया सुळे यांना राज्यातील राजकारणात रस नसून त्यांना राष्ट्रीय राजकारणात रस आहे. सुप्रिया सुळे यांना देशपातळीवर अनेक पुरस्कार प्राप्त झालं आहेत. त्यांना देशपातळीवरच काम करण्याची आवड आहे.