सुप्रिया सुळेंनी खड्ड्यांसोबत काढले सेल्फी, सरकारचा केला निषेध

सुप्रिया सुळेंनी खड्ड्यांसोबत काढले सेल्फी, सरकारचा केला निषेध

राज्यात खड्ड्यांच्या बाबत आंदोलनं आणि वाद सुरू असताना आता सुप्रिया सुळेंनीही या प्रश्नाकडे लक्ष केलंय. खड्ड्यांमुळे वाढलेले अपघात आणि यात गेलेले निष्पाप बळी यांना जबाबदार कोण हा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

  • Share this:

01 नोव्हेंबर : राज्यात खड्ड्यांच्या बाबत आंदोलनं आणि वाद सुरू असताना आता सुप्रिया सुळेंनीही या प्रश्नाकडे लक्ष केलंय. खड्ड्यांमुळे वाढलेले अपघात आणि यात गेलेले निष्पाप बळी यांना जबाबदार कोण हा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. माननीय मंत्रीमहोदय चंद्रकांत पाटील यांनी 'खड्डे दाखवा आणि हजार रूपये मिळवा' असं आवाहन केलंय, तर चला त्यांच्या या आवाहनाला भरभरून प्रतिसाद देऊया अशी सौम्य शब्दात टीकाही त्यांनी केली. त्यांनी पुण्यातल्या कात्रज-उंड्री बायपासवर जाऊन खड्ड्यांसोबत सेल्फी काढले.

पाहूयात सुप्रिया सुळेंनी आपल्या निवेदनात काय म्हटलंय ते..

सेल्फी विथ खड्डे

हा पुण्यातला कात्रज -उंड्री बायपास आणि बोपदेव घाट परिसर !!! राज्यातला एकही रस्ता असा नाही ज्यावर खड्डे नाहीत.! खड्ड्यांमुळे वाढलेले अपघात, हकनाक गेलेले बळी याला जबाबदार कोण ? सर्वत्र हेच चित्र असताना आपले माननीय मंत्रीमहोदय चंद्रकांत पाटील मात्र 'खड्डे दाखवा आणि हजार रुपये मिळवा' असं आवाहन करत आहेत.

चला तर मग त्यांच्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद देऊया.. खड्डे असलेले रस्ते त्यांना दाखवून देऊया. मी सुरुवात केली आहे, तुम्ही करताय ना?

First published: November 1, 2017, 1:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading