Home /News /maharashtra /

सुप्रिया सुळे होणार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री? शरद पवार म्हणाले...

सुप्रिया सुळे होणार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री? शरद पवार म्हणाले...

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळे (Supriya sule) यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली होती.

    मुंबई, 03 डिसेंबर : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळे (Supriya sule) यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली होती. मात्र 'सुप्रिया सुळे यांचा इंटरेस्ट राज्यात नाही, त्यांना राष्ट्रीय राजकारणात अधिक रस आहे' असं म्हणत राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांनी आपली भूमिका स्पष्ट करत चर्चेला पूर्णविराम दिला आहे. शरद पवार यांचा 12 डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दैनिक लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली. काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, 'भविष्यात शरद पवार हे पुतण्याला नव्हे तर सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करतील' असं विधान करून अजित पवारांना टोला लगावला होता. त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या नावाची मुख्यमंत्रिपदासाठी चर्चा सुरू झाली होती. शरद पवार यांना याबद्दल विचारले असता त्यांनी स्पष्ट मत मांडले आहे. डाबर, पतंजली, झंडुसह अनेक ब्रँडच्या मधात मोठी भेसळ; चीनचा मोठा हात,CSE चा खुलासा 'सुप्रिया सुळे यांना राज्यात इंटरेस्ट नाही, त्यांना राष्ट्रीय राजकारणात अधिक रस आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना संसदपटू पुरस्कार मिळाला होता.  प्रत्येकाचा एक इंटरेस्ट असतो, त्यामुळे सुप्रिया सुळे यांचा इंटरेस्ट हा राज्यात नसून तो राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात आहे' असं शरद पवार यांनी स्पष्ट केले. राणे पितापुत्र अडकले नव्या वादात, 13 बोलेरो गाड्यांच्या मालकांना बँकेच्या नोटीसा यावेळी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबद्दल सवाल केला असता शरद पवार यांनी महत्त्वाचे विधान केले. 'कोणत्याही पक्षामध्ये त्याच्या नेतृत्वाची मान्यता पक्षात आणि लोकांमध्ये किती असते, हे पाहणे महत्त्वाचे असते. आज काँग्रेसमध्ये रँक अँड फ्रँकटी स्थिती लक्षात घेतली तर आजही गांधी-नेहरू परिवाराबाबतची आस्था काँग्रेसच्या नेत्यांमध्ये पाहण्यास मिळत आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी हे दोघेही त्यांच्या कुटुंबाचे प्रतिनिधित्व करत आहे. त्यामुळे बरेच नेते हे त्यांच्या विचारांचे आहेत आणि वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे' असं मत शरद पवार यांनी व्यक्त केले. देशात राहुल गांधी यांचे नेतृत्व मानायला तयार आहे का? असा सवाल केला असता शरद पवार म्हणाले की, 'त्यांच्यामध्ये काही प्रश्न आहे. राहुल गांधी यांच्या कामात सातत्याचा थोडासा अभाव आहे' असं मत व्यक्त केले.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: NCP, Supriya sule

    पुढील बातम्या