मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'संजय राठोड यांना मंत्रिपद दिलं याचा आनंद, कारण...'; सुप्रिया सुळेंनी मानले भाजपचे आभार

'संजय राठोड यांना मंत्रिपद दिलं याचा आनंद, कारण...'; सुप्रिया सुळेंनी मानले भाजपचे आभार

सुप्रिया सुळे म्हणाल्या, की संजय राठोड यांना मंत्रिपद दिलं, याचा मला आनंदच आहे. पूजा राठोड प्रकरणात संजय राठोड यांचा काहीही सहभाग नाही, हे आम्ही आधीच सांगत होतो.

  • Published by:  Kiran Pharate
मुंबई 09 ऑगस्ट : मागील बऱ्याच दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आज अखेर पार पडला. एकनाथ शिंदे गटाचे 9 तर भाजपचे 9 अशा एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र, या मंत्रिमंडळात संजय राठोड यांनाही संधी देण्यात आल्याने गोंधळ उडाला आहे. पूजा चव्हाण प्रकरणात अडकलेल्या संजय राठोडांनी मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्याने प्रश्न उपस्थि होत असताना सुप्रिया सुळे यांनी मात्र राठोड यांची पाठराखण केली आहे. ..म्हणनू संजय राठोडांना मंत्रिमंडळात घेतलं; विस्तारानंतर मुख्यमंत्र्यांनी शिंदेंची पहिली प्रतिक्रिया सुप्रिया सुळे म्हणाल्या, की संजय राठोड यांना मंत्रिपद दिलं, याचा मला आनंदच आहे. पूजा राठोड प्रकरणात संजय राठोड यांचा काहीही सहभाग नाही, हे आम्ही आधीच सांगत होतो. मात्र, संजय राठोड यांच्यावर त्यावेळी सर्वात जास्त आरोप भारतीय जनता पक्षाने केले आहेत. आम्ही कुठल्याही प्रकारचे आरोप त्यांच्यावर केले नाहीत. भारतीय जनता पक्षाने बेभान आरोप करत संजय राठोड यांचं कुटुंब उद्धवस्त करण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही सुप्रिया सुळे यांनी केला. पुढे त्या म्हणाल्या, की राज्यात आज मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. आमचे जास्तीत जास्त सहकाऱ्यांचा भारतीय जनता पक्षाने मंत्रिमंडळामध्ये समावेश केला आहे. यासाठी आम्ही भारतीय जनता पक्षाचे मनःपूर्वक आभारी आहे. भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांनी आमच्या हिऱ्यांना खरी ओळख दिली आहे. आमचे सहकारी असलेल्या लोकांनाच मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आलं आहे .यामुळे मी भारतीय जनता पक्षाचे मनापासून आभार मानते, असं त्या म्हणाल्या. याचवेळी मंत्रिमंडळात एकाही महिलेला संधी दिली गेली नाही, याबद्दल त्यांनी नाराजीही व्यक्त केली आहे. राज्यात मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या शपथविधीत 18 मंत्र्यांनी शपथ घेतली परंतु यात महिलांना प्रतिनिधीत्त्व देण्यात आलं नाही. राज्याच्या स्त्री-शक्तीवर हा अन्याय आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
First published:

Tags: Sanjay rathod, Supriya sule

पुढील बातम्या