मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अमोल कोल्हे थेट अमित शाहांच्या भेटीला, पड्यामागे खरंच काही घडतंय? सुप्रिया सुळे म्हणतात....

अमोल कोल्हे थेट अमित शाहांच्या भेटीला, पड्यामागे खरंच काही घडतंय? सुप्रिया सुळे म्हणतात....

अमोल कोल्हे थेट अमित शाहांच्या भेटीला, सुप्रिया सुळे म्हणतात...

अमोल कोल्हे थेट अमित शाहांच्या भेटीला, सुप्रिया सुळे म्हणतात...

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Sangli, India
  • Published by:  Chetan Patil

सांगली, 1 ऑक्टोबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अमोल कोल्हे आणि अमित शाह यांच्या भेटीमागे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. दुसरीकडे कोल्हे यांनी शिवप्रताप गरुडझेप या त्यांच्या चित्रपटाच्या निमित्ताने शाह यांची भेट घेतल्याचं अधिकृत कारण समोर आलं आहे. पण शाह-कोल्हे यांच्या भेटीमागे काहीतरी वेगळं राजकीय कारण तर नाही ना? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. दरम्यान, या भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली.

"अमोल कोल्हे यांनी एक सिनेमा केला असून, त्यासाठी ते सर्व पक्षांच्या नेत्यांना भेटत आहेत. अमोल कोल्हे अमित शहा यांना भेटले असतील तर त्यात गैर काय? हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे. पूर्वी महाराष्ट्रात मतभेद होते, मनभेद नव्हते. तसेच अमोल कोल्हे यांनी सुसंस्कृतपणा दाखवला आहे", अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

सुप्रिया यांची भाजपवर खोचक शब्दांमध्ये टीका

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भारतीय जनता पक्षावर सडकून टीका केली. सुप्रिया सुळे आज सांगली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपमध्ये विविध पक्षातील दिग्गज नेत्यांनी प्रवेश केला आहे. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. त्यांनतर शिंदे गटाला शिवसेनेच्या अनेक आमदार-खासदारांनी पाठिंबा दिला. यापैकी अनेक आमदारांवर ईडी आणि सीबीआयची कारवाई झाली होती. पण त्यांचे भाजपसोबत संबंध जोडले गेल्यानंतर त्यांच्यावर नंतर कारवाई झाली नाही. त्यामुळे भाजप म्हणजे पापं धुणारी वॉशिंगमशीन आहे, अशी टीका याआधीही महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आली आहे. याचाच धागा पकडत सुप्रिया सुळे यांनी भाजपचा भारतीय जनता लॉन्ड्री पक्ष असा उल्लेख केला आहे.

(युती सरकारमध्येच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं, माजी मंत्र्याचा गौप्यस्फोट)

"विरोधात बोलला म्हणजे तो शत्रू झाला, अशी नवीन संस्कृती भारतीय जनता लॉन्ड्री पक्षाने सुरू केली आहे. भाजपच्या आमदार-खासदारांनी ईडी सरकारला घरचा आहेर दिला आहे. भारतीय जनता लॉन्ड्री पक्षाच्या आमदार-खासदारांनी कायदा-सुव्यवस्थेबद्दल टीका केली आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी आत्ता आत्मचिंतन करायला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिगंगत नेते आर आर पाटील गृहमंत्री असताना राज्याची काय स्थिती होती आणि आता परिस्थिती दुर्दैवी बनली आहे", असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

"राज्यातील सरकार हे ओरबाडून आणलेले आहे. टीका झाल्यानंतर तीन महिन्यानंतर पालकमंत्री नेमले आहेत. अनेक मंत्री अजून त्यांच्या विभागातच गेलेले नाहीत. तर मंत्रालयात गेले तर अनेक मंत्रीच भेटत नाहीत. ओरबाडून सरकार स्थापन केलं. मात्र त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही. सर्वसामान्य माणूस भरडला जात आहे. अनेक नेत्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी विधाने केले आहेत. जे निर्णय घेतले त्यांची अंमलबजावणी होत नाही. प्रशासन नेमकं कोण चालवत आहे हे देवाला ठावूक", अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

First published:

Tags: Amit Shah, Supriya sule