Home /News /maharashtra /

सुप्रिया सुळे पोहोचल्या एकनाथ खडसेंच्या घरी, भाजप खासदार रक्षा खडसे पोहोचल्या भेटीला!

सुप्रिया सुळे पोहोचल्या एकनाथ खडसेंच्या घरी, भाजप खासदार रक्षा खडसे पोहोचल्या भेटीला!


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे या आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर होत्या.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे या आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर होत्या.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे या आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर होत्या.

    इम्तियाज अली, प्रतिनिधी जळगाव, 17 मे : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे  (ncp mp supriya sule) यांनी आज जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे (eknath khadse) यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी खडसेंच्या सून आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे (bjp mp raksha khadse) सुद्धा हजर होत्या. या भेटीमुळे राजकीय चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे या आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर होत्या.  आज रात्री मुक्ताईनगर येथे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी सुप्रिया सुळे यांनी खडसे कुटुंबीयांची भेट घेतली.  या भेटीप्रसंगी एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे, कन्या रोहिणी खडसे यांच्यासह खडसे यांच्या सून तथा भाजपा खासदार रक्षा खडसे यांची उपस्थिती होत्या. मात्र, या भेटीचा कुठलाही राजकीय हेतू नसून केवळ खडसे कुटुंबीयांची कौटुंबिक भेट घेऊन, कौटुंबिक चर्चा झाल्याची प्रतिक्रिया यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. रक्षा खडसे या कोथडी इथं त्याचे निवासस्थान आहे. पण, सुप्रिया सुळे येणार असल्याची माहिती मिळाल्यावर रक्षा खडसे या भेटीसाठी पोहोचल्या. (ड्रायव्हिंग लायसन्सचं वयंही नव्हतं, एकाच बाईकवर चौघांचा प्रवास, अपघात झाला अन्) दरम्यान, त्याआधी दुपारी जळगावमध्ये महागाईच्या विरोधात राष्ट्रवादीने आंदोलन केले होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे उपस्थितीत होत्या. पदाधिकाऱ्यांशी बोलत असताना पुण्यातील घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला. 'हा शाहु-फुले-आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे. या राज्यात सर्व महिलांचा सन्मान करण्याची शिकवण आम्हाला मिळाली आहे. आता यापुढे या राज्यात कुठल्या पुरुषाने जर महिलांच्या अंगावर हात उचलला तर मी स्वत: तिथे जाईन आणि त्याविरोधात कोर्टात जाईल. त्याचा हात तोडून त्यांच्या हातात देईल, काय लावलं आहे हे? असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी इशारा दिला. (तुम्हाला माहीत आहे का? मांजरीही एकमेकांना आणि माणसांना नावानं ओळखू शकतात) तसंच,  महागाई कमी करण्याच्या नावाखाली भाजप सरकार केंद्राच्या सत्तेत आले, परंतु. गेल्या आठ वर्षात घरगुती गॅस, पेट्रोल-डिझेलची मोठ्या प्रमाणावर दरवाढ केली आहे. या महागाईमुळे देशातील सर्वसामान्य जनतेचं कंबरड मोडले आहे, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी महागाईविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या