भविष्यात NCP भाजपबरोबर जाईल का? सुप्रिया सुळेंनी दिलं हे उत्तर

भविष्यात राष्ट्रवादी भाजपबरोबर युती करू शकते का हा असा थेट प्रश्न राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना विचारला असता, त्यांनी स्पष्ट नकार किंवा होकार दिला नाही. सुप्रिया सुळेंनी काय उत्तर दिलंय वाचा...

  • Share this:

नीरज

नवी दिल्ली, 3 नोव्हेंबर : महाराष्ट्रात शिवसेनेबरोबर आघाडी करून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने एक नवा इतिहास घडवला. हे तीन पक्षांचं सरकार कसं चालणार, किती चालणार वगैरे प्रश्न विचारण्यात येत असले, तरी या ऐतिहासिक महाविकास आघाडीचं श्रेय शरद पवार यांच्याकडे जातं. शरद पवार यांना ओळखायला 100 वर्षं जातील, हे शिवसेनेचे नेते संजय राऊतही वारंवार सांगतात. शेवटच्या क्षणापर्यंत शरद पवार यांचे पत्ते नेमके कुठले आणि ते कधी उलगडले जातील याचा आत्ताही नेम लागला नाही. आता या महाविकासआघाडीचं भविष्यही शरद पवार यांच्या हाती आहे, असं राजकीय विश्लेषक सांगतात. पण भविष्यात राष्ट्रवादीचा डाव काय असेल आणि भाजपबरोबर ते युती करू शकतात हा असा थेट प्रश्न राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना विचारला असता, त्यांनी स्पष्ट नकार किंवा होकार दिला नाही.

News18  शी याविषयावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, "जे पक्षाचं मत असेल, तेच माझं असेल. मी पक्षाची अनुशासित शिपाई आहे. त्यामुळे माझं वेगळं मत नसेल." पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच्या भेटीत नेमकं काय झालं याचा गौप्यस्फोट शरद पवार यांनी सोमवारी केला. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या भाजपबरोबर सरकार स्थापनेत सहभागी होण्याविषयी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. "अजित पवार आमचे ज्येष्ठ नेते आहेत. ते कधीच भाजपकडे गेले नव्हते," असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. "जे झालं तरे आमच्या पक्षाचं आणि आमच्या कुटुंबाचं वैयक्तिक प्रकरण होतं", असंही त्या म्हणाल्या.

वाचा - अजितदादांच्या भाजपबरोबर जायच्या 'त्या' निर्णयाबद्दल पहिल्यांदाच बोलल्या सुप्रिया

शरद पवार यांनी काल एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत नरेंद्र मोदींनी सुप्रियाला मंत्रिपदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट केला. त्याविषयी सुप्रिया यांना विचारलं असता, त्या म्हणाल्या, "ही भेट ही दोन मोठ्या नेत्यांची होती. त्या भेटीत मी नव्हते. पंतप्रधानांनी मला मंत्रिपदाची ऑफर देणं हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे."

News18 शी या सगळ्या विषयाबद्दल बोलताना सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधानांनी आपल्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल आभार व्यक्त केले.  भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस भाजपबरोबर जाणार का, यावर त्यांनी स्पष्ट नकार दिला नाही. त्या म्हणाल्या, "

काय होती पंतप्रधानांची ऑफर?

गेल्या महिनाभरात घडलेल्या घटनांचा पहिल्यांदाच खुलासा शरद पवार यांनी एका मुलाखतीत केला.

हे वाचा - बुलेट ट्रेनच्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा स्पष्ट खुलासा

यात सगळ्यात जास्त चर्चा झाली ती शरद पवार आणि पंतप्रधान मोदींच्या भेटीची. या भेटीत नेमकं काय झालं? पंतप्रधान काय म्हणाले? हा पवारांचाच डाव होता का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर शरद पवारांनी दिलीय.

संबंधित - नरेंद्र मोदींनीच ठेवला होता युतीचा प्रस्ताव, शरद पवारांनी केला सर्वात मोठा खुलासा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच आपल्यापुढे युतीचा प्रस्ताव ठेवला होता, असं शरद पवारांनी सोमवारी सांगितलं. शरद पवार म्हणाले की, "पंतप्रधानांना भेटण्याची वेळ मी आधीच मागितली होती. मात्र ते जमू शकलं नाही. शेवटी पंतप्रधान कार्यालयाने वेळ दिली. संभ्रम निर्माण व्हावा अशी पंतप्रधान कार्यालयाची इच्छा असावी. मात्र मला त्याची काळजी नव्हती. मी विदर्भातल्या दुष्काळी दौऱ्यावरून आलो होतो. मलाही त्यांना भेटायचं होतं त्यामुळे मी भेटलो."

आमच्या भेटीत शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी बोलणं झालं आणि शेवटी जाताना पंतप्रधान मोदींनीच हा विषय काढला असं पवार यांनी सांगितलं.

--------------------------

अन्य बातम्या

शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी अशा तयार झाल्या सोनिया गांधी, पवारांनी उघड केलं गुपित

'भारत अंतराळात कचरा वाढवतोय', पाकिस्तानच्या मंत्र्यांची मुक्ताफळं

2050 पर्यंत मुंबई खरंच बुडणार का? मोदी सरकारने संसदेत दिलं उत्तर

भीमा कोरेगाव प्रकरणी धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 3, 2019 10:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading