मी,सुप्रिया सुळे,आयबीएन लोकमत,हडपसर !

मी,सुप्रिया सुळे,आयबीएन लोकमत,हडपसर !

. सुप्रिया सुळे यांनी पुण्याच्या हडपसरमध्ये रस्त्यावर उतरून आयबीएन लोकमतच्या सिटीझन जर्नलिस्ट म्हणून वार्तांकन केलंय.

  • Share this:

03 नोव्हेंबर : खड्डे विथ सेल्फी मोहीम राबवून धुराळा उडवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आज पत्रकाराच्या भूमिकेत पाहण्यास मिळाल्यात. सुप्रिया सुळे यांनी पुण्याच्या हडपसरमध्ये रस्त्यावर उतरून आयबीएन लोकमतच्या सिटीझन जर्नलिस्ट म्हणून वार्तांकन केलंय.

राज्याचे महसूल आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 1 नोव्हेंबरपासून राज्यात एक खड्डाही दिसणार नाही अशी भीम गर्जना केली होती. त्यांची ही घोषणा किती खरी आहे हे पटवून देण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी 1 नोव्हेंबरपासून 'सेल्फी विथ खड्डे' मोहिम राबवली. त्यांच्या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळतोय.

आज सुप्रिया सुळे यांनी हडपसर सासवड मार्गावर खड्ड्यांमुळे झालेल्या दुरवस्थेचं सेल्फी घेतले. तेव्हा बसचे चालक, दुचाकी,चारचाकी चालक यांनीही त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एवढंच नाहीतर सुप्रिया सुळे यांनी यावेळी आयबीएन लोकमतच्या सिटीझन जर्नलिस्टची भूमिका बजावत खड्डेयुक्त रस्त्यांची झालेली चाळण याचा आढावा घेतला. स्वत: सुप्रिया सुळेंनी आयबीएन लोकमतचा 'बूम माईक' घेऊन रस्त्याची कशी चाळण झाली आहे हे सांगितलं. शिवाय या मार्गांवरुन येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना होणारा त्रास,त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.  ज्या प्रकारे आमचे प्रतिनिधी म्हणतात तसंच "मी, सुप्रिया सुळे,आयबीएन लोकमत,हडपसर" असं म्हणायल्याही त्या विसरल्या नाहीत.

First published: November 3, 2017, 5:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading