सरकारने राज्य 'अंधारात' लोटलं - सुप्रीया सुळेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

सरकारने राज्य 'अंधारात' लोटलं - सुप्रीया सुळेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

राज्य सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे राज्य अंधारत गेलं आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी केलाय.

  • Share this:

जळगाव, ता.10 ऑक्टोबर : राज्य सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे राज्य अंधारत गेलं आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी केलाय. कोळशाचा तुटवडा असल्यानं राज्यातल्या अनेक भागात लोड शेडींग सुरू झालंय. सणा सुदीच्या दिवसांमध्ये लोड शेडींग होत असेल तर लोकांनी काय करायचं असा सवालही त्यांनी केला. लोडशेडींग असल्यामुळे शेतकऱ्यांना आणि लघुउद्योजकांना फटका बसतोय. त्यामुळं सरकारने वेळीच जागं झालं पाहिजे अशा इशाराही त्यांनी दिला.

तातडीनं दुष्काळ जाहीर करा

राज्यात पाऊस कमी झाल्यानं दुष्काळाचं सावट आहे. शेतकरी अडचणीत आलाय असं असताना तातडीनं दुष्काळ जाहीर केला पाहिजे अशी मागणीही सुप्रीया सुळे यांनी केली. शेतकऱ्यांना दुष्काळाच्या झळा बसत असताना मुख्यमंत्री मात्र 'सरकारी' कारभार करत आहेत. पथक येईल पाहणी होईल आणि मग नंतर दुष्काळ जाहीर करू असं मुख्यमंत्री म्हणताहेत. दुष्काळ जाहीर करण्याची ही कुठली पद्धत आहे असा सवालही त्यांनी केला. दुष्काळ जाहीर झाला तर शेतकऱ्यांना तातडीनं मदत मिळेत असंही त्यांनी सांगितलं.

First published: October 10, 2018, 6:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading