...जेव्हा ताई आणि दादांनी मारला भजी, इमरतीवर ताव

...जेव्हा ताई आणि दादांनी मारला भजी, इमरतीवर ताव

अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे अचानक हॅाटेल मध्ये आल्याने हॅाटेल मालकासह कर्मचारीही अचंबित झाले. या दोघांनीही भजे आणि इमरती खाल्ली.

  • Share this:

औरंगाबाद, ता.9 ऑक्टोबर : औरंगाबादेत आज 'संविधान बचाव, देश बचाव' या मोहिमेसाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि सुप्रिया सुळे आल्या होत्या. सकाळी कार्यक्रमाला जाण्याआधी त्यांनी चक्क औरंगाबादेतील प्रसिध्द भजे आणि इमरतीचा आस्वाद घेतला. अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे अचानक हॅाटेल मध्ये आल्याने हॅाटेल मालकासह कर्मचारीही अचंबित झाले. या दोघांनीही भजे आणि इमरती खाल्ली. यावेळी सुप्रियाताईंनी फेसबुक लाईव्ह करण्याचा प्रयत्न केला मात्र नेटवर्क नसल्याने त्यांना लाईव्ह करता आले नाही.

ताई आणि दादा हे हॉटेलमध्ये आल्याचं कळल्यावर कार्यकर्त्यांचीही गर्दी झाली. कार्यकर्त्यांचं फोटोसेशन सुरू असतानाच सर्व नेत्यांनी भजे आणि इमरतीचा आस्वाद घेतला. नतर जाताना हॉटेल मालकानेही दोनही नेत्यांसोबत फोटो काढून घेतला.

भजी आणि इमरती दादा आणि ताईंना आवडली जाताना दादांनी हॉटेलचं बील देण्यासाठी पाचशेची नोट काढली. मात्र हॉटेलमालक पैसे घ्यायलाच तयार नव्हता. शेवटी दादांनी आग्रहानं त्यांना पैसे दिले आणि कार्यकर्त्यांच्या लवाजाम्यासह दोनही नेते पुढच्या आंदोलनासाठी निघाले.

आता निवडणुका जवळ आल्याने नेत्यांचा जनसंपर्कावर भर आहे. अशा कार्यक्रमांदरम्यान मुद्दाम लोकांना भेटण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाज वाढवण्यासाठी राजकीय नेते अशा भेटी देत असतात. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही मध्यप्रदेशात असताना एका टपरीवर थांबून चहा घेतला होता.

 

कांशीराम यांचा आज स्मृती दिन : त्यांच्यामुळेच मिळाली देशाला पहिली महिला दलित मुख्यमंत्री

First published: October 9, 2018, 6:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading