मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

...तर बाळ घरातच जन्मलं असतं, सुप्रिया सुळेंनी पहिल्यांदाच सांगितला बाळंतपणाचा किस्सा

...तर बाळ घरातच जन्मलं असतं, सुप्रिया सुळेंनी पहिल्यांदाच सांगितला बाळंतपणाचा किस्सा

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एका मुलाखतीत राजकारणासह त्यांच्या खासगी आयुष्यातील काही गोष्टींबाबत खुलासा केला.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एका मुलाखतीत राजकारणासह त्यांच्या खासगी आयुष्यातील काही गोष्टींबाबत खुलासा केला.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एका मुलाखतीत राजकारणासह त्यांच्या खासगी आयुष्यातील काही गोष्टींबाबत खुलासा केला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Yadav

मुंबई, 25 जानेवारी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अनफिल्टर बाय समदिश या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से सांगितले आहेत. राजकीय कारकिर्द, राजकारणातील किस्सेही त्यांनी सांगितले. दरम्यान, त्यांनी त्यांच्या आयुष्यातला असा एक प्रसंग सांगितला जो त्यांनी याआधी कधी उघड केला नव्हता. मुलाच्या जन्मावेळी उद्भवलेली परिस्थितीबद्दल खुलासा करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मला तेव्हा हॉस्पिटलला नेले नसते तर घरातच बाळाचा जन्म झाला असता.

आई असल्याचा मला अभिमान आहे. पण बाळंतपण ही माझ्यासाठी वेदनादायी गोष्ट होती. इपिडुरियल इंजेक्शन घेतली होती. बाळंतपण नॉर्मल व्हावं असंच मला वाटत होतं. गर्भवती असतानाचा काळ खूप चांगला होता, प्रत्येक जण तुमच्याशी चांगलं वागत असतो. ९ महिने तुम्ही राणी असल्यासारखं वागवलं जातं. जेव्हा बाळाचा जन्म होतो तेव्हा तुम्हाला बाजूला टाकलं जातं. आता तुम्ही ९ महिने आराम केला, झालं असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

हेही वाचा : Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळेंनी कधीच वापरलं नाही डेबिट कार्ड, मग व्यवहार कशा करतात?

एक आई म्हणून जेव्हा बाळाचा जन्म होतो तेव्हा डॉक्टरांना तुम्ही एकच प्रश्न विचारता की बाळ कसंय? आईला मुलगा की मुलगी याच्याशी देणं घेणं नसतं असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी एक आई म्हणून आपल्या भावना व्यक्त केल्या. तसंच मुलीच्या जन्मानंतर जेव्हा दुसऱ्यांदा गर्भवती होत्या तेव्हाचा एक किस्सा सुप्रिया सुळे यांनी सांगितला. मुलाचा जन्म तीन आठवडे आधी झाला. तेव्हा आई दररोज मला चालयाला लावायची. स्वत:चं काम स्वत: करायला लावायची असे त्या म्हणाल्या.

सुप्रिया सुळे यांनी सांगितलं की, मुलाचा जन्म झाला त्याच्या आधी मी चालायला जात होते तेव्हा पोटात दुखायला लागलं. तेव्हा आई म्हणाली, 'पोटात दुखत नाही, तुला तसं वाटतंय फक्त.' पण माझ्या पोटात दुखतंय, हे मला माहिती होतं. याआधी असा त्रास मी मुलीच्या जन्मावेळी सहन केला होता. तरी आईने जेव आणि झोप असं सांगितलं. माझे पती, आई-वडील झोपले. पण पोटात दुखतच होतं.

हेही वाचा : चमत्कार नव्हे, कला! बागेश्वर महाराजांना आव्हान देणारी माइंड रिडर सुहानी चर्चेत

मी डॉक्टरांना फोन केला आणि पोटात दुखत असल्याचं सांगितलं. डॉक्टरांनी एक तासाने कॉल करायला सांगितलं. त्यांनीही माझ्यावर अविश्वास असल्यासारखं दाखवलं. डॉक्टरांनीही आईने काय म्हटलं हे विचारलं. त्यानंतर म्हणाले की, सहन झाला नाही तर सांगा, मी येईन. तासभर त्रास सहन होण्यापलिकडे गेला. तेव्हा पतीने मला हॉस्पिटलला नेलं. त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं की, आईला फोन करा. मग पतीने फोन केला आणि आईला सांगितलं की डिलिव्हरी होतेय, लवकर या. मला तेव्हा वाटलं की अशी कशी फॅमिली आहे. तर आई म्हटली की हे सायकोसोमॅटिक आहे वाटलं. आधीच डायलेटिंग सुरू झालेलं. हॉस्पिटलला नसते नेले तर घरीच बाळ जन्माला आलं असतं असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

मला पोटात दुखत असताना हे हलक्यात घेत होते. काही नाही, काही नाही. पण माझं पोट दुखतंय. आता पोट दुखतंय त्याचा पुरावा कसा द्यायचा? असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. समदिशने घेतलेल्या मुलाखतीत अनेक प्रश्न आणि मुद्द्यांवर सुप्रिया सुळे यांनी मनमोकळी उत्तरे दिली आहेत. यात भाजपमध्ये असणाऱ्या पाच चांगल्या गोष्टी, नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना झालेली भेट, काँग्रेस अन् राष्ट्रवादीतला फरक इत्यादी गोष्टींचा समावेश आहे.

First published:

Tags: NCP, Supriya sule