'बीएस-3' गाडी खरेदी करत असाल तर थांबा...आधी हे वाचा !

'बीएस-3' गाडी खरेदी करत असाल तर थांबा...आधी हे वाचा !

बीएस 3 गाड्या घेण्यासाठी धावपळ करत असाल तर थोडं थांबा.. कारण आज बुकिंग केलेल्या गाड्यांची नोंदणी होणार नाही

  • Share this:

31 मार्च : बीएस 3 गाड्या घेण्यासाठी धावपळ करत असाल तर थोडं थांबा.. कारण आज बुकिंग केलेल्या गाड्यांची नोंदणी होणार नाही असं नागपूर परिवहनने स्पष्ट केलंय. हा नियम संपूर्ण देशभरात लागू असणार आहे.

सुप्रीम कोर्टाने बीएस-3 इंजिन असलेल्या गाड्यांवर निर्बंध घातल्यामुळे देशभरात बीएस-3 गाड्यांच्या विक्रीसाठी झुंबड उडाली आहे. दसरा, दिवाळीला असते तशी गर्दी आज गाड्यांच्या शोरूममध्ये होती. पण, तुम्हाला असं वाटत असेल की, आज घसघशीत सूट घेऊन गाडी खरेदी करू किंवा आज गाडी बूक करू आणि डिलिव्हरीनंतर घेऊ तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात.

कारण, बीएस ३ गाड्या फक्त आज बूक करून चालणार नाही. ज्या गाड्यांची ३१ मार्चपूर्वी डिलिव्हरी देण्यात आली आहे. ज्यांचे बिल तयार करण्यात आले आहे. त्याच गाड्यांचे रजिस्ट्रेशन होणार असल्याचं नागपूरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी शरद जिचकार यांनी स्पष्ट केलंय.

फक्त रेजिस्ट्रेशन करून गाड्यानंतर दिल्या तर त्या गाड्यांची नोंदणी होणार नाही. तुम्हाला जर कोणतेही शो रूम अशी हमी देऊन गाडी विकत असेल तर अशा शोरुम चालकांवर फौजदारी कारवाई सुद्धा होणार आहे असंही जिचकार यांनी सांगितलं.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशात ३१ तारखेनंतर बीएस ३ गाड्या कुठल्याही प्रकारात नोंदवल्या जाणार नाही असं स्पष्ट नमूद केलंय अशी आठवणही शरद जिचकार यांनी करून दिली.

बीएस-3 गाडी खरेदी करावी की नाही ?

- जर तुम्ही 31 मार्चआधी गाडी बूक केली असेल तर कोणतेही अडचण नाही

- 31 मार्च आधी बूक केलेल्या गाडीचे होणार रजिस्ट्रेशन

- जर तुम्ही आज गाडी बूक करणार असाल तर तिचे रजिस्ट्रेशनच होणार नाही

 - नुसतं रजिस्ट्रेशन करणाऱ्या शोरुमवरही कारवाई होणार

- विनारजिस्ट्रेशन गाड्या विकणाऱ्या शो रूमवर होऊ शकते फौजदारी कारवाई

First published: March 31, 2017, 5:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading