मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Vinayak mete : वाटलं होतं साहेब परत येतील, मेटेंच्या मुंबईतील घरी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर

Vinayak mete : वाटलं होतं साहेब परत येतील, मेटेंच्या मुंबईतील घरी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर

विनायक मेटे यांचं पार्थिव हे वडाळा येथील भक्ती पार्क या निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

विनायक मेटे यांचं पार्थिव हे वडाळा येथील भक्ती पार्क या निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

विनायक मेटे यांचं पार्थिव हे वडाळा येथील भक्ती पार्क या निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

    मुंबई, 14 ऑगस्ट : मराठा आरक्षणासाठी लढणारे शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती निधन झालं आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. मुंबईतील वडाळा येथील त्यांच्या निवासस्थानी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. आपल्या नेत्याचे दर्शन घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. विनायक मेटे यांच्या गाडीला मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात झाला आहे. त्यानंतर त्यांना पनवेलमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, पनवेल येथील शासकीय रुग्णालयामध्ये शवविच्छेदन होणार नाही. त्यामुळे ते जेजे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्यामुळे मेटे यांचं पार्थिव हे जेजे रुग्णालयात नेण्यात येत आहे. त्यानंतर त्यांचं पार्थिव हे वडाळा येथील भक्ती पार्क या निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे या वडाळा येथील भक्तीपार्क या निवासस्थानी पोहोचल्या आहेत. भक्ती पार्क परिसरामध्ये कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे. सकाळी त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते, त्यावेळी ते बरे होऊन परत येतील, अशी आशा होती. पण काही वेळानंतर मेटे यांच्या निधानाची बातमी आली, त्यामुळे आम्हाला मोठा धक्का बसला आहे. आमचे साहेब आम्हाला सोडून गेले, असं म्हणत कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले आहे.  विनायक मेटे यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी बैठकीची वेळ का बदलली? दरम्यान, मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर (mumbai pune expressway) विनायक मेटे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. पण या अपघातावरून आता कार्यकर्त्यांनी काही प्रश्न उपस्थितीत केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाची आज संध्याकाळी बैठक बोलावली होती. या बैठकीला विनायक मेटे यांना बोलावण्यात आले होते. पण मराठा आरक्षणाची बैठक आज दुपारी 4 वाजता होती. मात्र काहींच्या आग्रहामुळे ती अचानक 12 वाजता आयोजित करण्यात आली, असा आरोप मराठा मोर्चा समन्वयक दिलीप पाटील यांनी केला आहे. अचानक बैठकीचा वेळ का बदलण्यात आला. त्यामुळे अनेक नेते रात्री उशिरा मुंबईच्या दिशेने निघाले, बैठक 4 वाजता असती तर मेटे वाचले असते, असंही पाटील म्हणाले.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या