धुळ्यात गुंडाच्या हत्येनंतर समर्थकांकडून जाळपोळ, एसटीवर दगडफेक

धुळ्यात गुंडाच्या हत्येनंतर समर्थकांकडून जाळपोळ, एसटीवर दगडफेक

. या गुंड्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ त्यांच्या समर्थकांनी शहरात जाळपोळ केल्याची घटना घडलीये.

  • Share this:

21 जुलै : धुळ्यातला कुख्यात गुंड रफियोद्दीन शेख उर्फ गुड्ड्याचा निर्घृण खून करणाऱ्या मारेकऱ्यांना पकडण्यात चार दिवस उलटूनही पोलिसांना यश आलेले नाही. या गुंड्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ त्यांच्या समर्थकांनी शहरात जाळपोळ केल्याची घटना घडलीये. एवढंच नाहीतर या समर्थकांनी एसटीवर दगडफेक सुद्धा केलीये.

संशयितांची माहिती सांगणार्‍यांचे नाव गुपित ठेवण्यात येईल, असंही त्यांनी म्हटलं आहे. 18 जुलैला कुख्यात गुंड गुड्ड्या याची निर्घृण हत्या झाली. कसायालाही लाजवेल अशा क्रूर पद्धतीने गुड्ड्याचा खात्मा करण्यात आला. जवळपास सर्वच मारेकरी सीसीटीव्हीत कैद झाले आहे. या प्रकरणी विलास गोयर, विजय गोयर, विक्की गोयर, शाम गोयर, राजा उर्फ भद्रा देवर, भीमा देवरे, यांच्यासह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. गेल्या चार दिवसांपासून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

पण, त्यांना अद्याप यश आलेले नाही. त्यात खूनाची क्लिप सर्वच ठिकाणी व्हायरल झाली आहे. ती यू-ट्यूबवरही जाऊन पोहोचली आहे. यामुळे शहरातील वातावरण दूषित झाले आहे. विविध स्तरावरुन आरोपींना अटक करण्याचा दबाव वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलीस प्रशासनाने फरार आरोपींवर बक्षीस जाहीर केलं आहे. या खूनाच्या गुन्ह्यातील आरोपींची माहिती देणार्‍यांना 10 हजार ते 50 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. तसंच माहिती देणार्‍यांची नावे गुपित ठेवण्यात येतील, असे पोलीस अधीक्षक एम.रामकुमार यांनी सांगितलं.

First published: July 21, 2017, 7:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading