अघोरीपणाचा कळस! 10 दिवसाच्या बाळाच्या पोटावर सळईने दिले चटके

अघोरीपणाचा कळस! 10 दिवसाच्या बाळाच्या पोटावर सळईने दिले चटके

बाळाला उपचारासाठी रूग्णालयात न नेता भोंदूबाबाकडे नेलं. त्यानंतर या भोंदूबाबाने बाळाचं पोट फुगलं आहे म्हणून त्याच्यावर थेट सळईने चटके दिले.

  • Share this:

अमरावती, 3 नोव्हेंबर : अंधश्रद्धेतून अवघ्या 10 दिवसाच्या बाळाला पोटावर गरम सळईने चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार मेळघाटात घडला आहे. या अघोरी प्रकारानंतर जखमी झालेल्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे.

मेळघाटातील धरणी तालुक्यातील डोमी इथल्या यशोदा पंकज बेठेकर यांच्या 10 दिवसांच्या लहान बाळाचं पोट फुगलं होतं. बेठेकर कुटुंबाने बाळाला उपचारासाठी रूग्णालयात न नेता भोंदूबाबाकडे नेलं. त्यानंतर या भोंदूबाबाने बाळाचं पोट फुगलं आहे म्हणून त्याच्यावर थेट सळईने चटके दिले.

भोंदूबाबाने दिलेले हे चटके त्या 10 दिवसांच्या त्या चिमुकल्या जीवाला सहन झाले नाहीत. चटक्यांमुळे जखमी झालेल्या चिमुकल्यावर उपचार सुरू होण्याआधीच त्याचा मृत्यू झाला आहे.

याप्रकरणी आतापर्यंत कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. हे प्रकार मेळघाटात नेहमीच घडत असतात. अशा भोंदूबाबांविरोधात कोणीही साधी तक्रारदेखील करत नाही. त्यामुळे या भागात भोंदूबाबांची दुकानं राजरोसपणे सुरू आहेत. त्यातून अनेक लहान बाळांना आपला जीव गमवावा लागला आहे.

दरम्यान, मेळघाटासारख्या मागास भागात अंधश्रद्धेतून आजही अशा प्रकारचे अमानुष प्रकार होत असतात. कुपोषित लहान बालकांचे पोट फुगल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयांत नेण्याऐवजी भोंदूबाबांकडे नेलं जातं. त्यामुळे हा भाग कुपोषणासोबत अंधश्रद्धेच्याही विळख्यात अडकला आहे.

VIDEO : कारने तीन तरुणांना चिरडलं; 2 जणांचा मृत्यू, 1 गंभीर

First published: November 3, 2018, 1:17 PM IST

ताज्या बातम्या