• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • अघोरी पणाचा कळस! 8 महिन्यांच्या बाळाच्या पोटावर दिले गरम विळ्यानं चटके

अघोरी पणाचा कळस! 8 महिन्यांच्या बाळाच्या पोटावर दिले गरम विळ्यानं चटके

पोटदुखीच्या आजारातून बरं करण्याच्या नावाखाली 8 महिन्यांच्या बाळाला गरम विळ्यानं चटके दिल्याचा अघोरी प्रकार समोर आला आहे.

  • Share this:
अमरावती, 19 जून: पोटदुखीच्या आजारातून बरं करण्याच्या नावाखाली 8 महिन्यांच्या बाळाला गरम विळ्यानं चटके दिल्याचा अघोरी प्रकार समोर आला आहे. अमरावती जिल्हयातील अतिदुर्गम भागात असलेल्या मेळघाटात ही घटना घडली आहे. भरारी पथकाला याची महिती मिळताच चिमुरड्याला पुढील वैद्यकीय उपचारार्थ हलवले आहे. आई-वडिलांना विचारणा केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. हेही वाचा...प्रियकरांचा पळून जाऊन लग्न करण्यास नकार, 2 मैत्रिणींनी उचललं टोकाचं पाऊल आदिवासी समाज आज देखील अंधश्रद्धा जपतो आहे, हे पुन्हा एकदा उघड झालं आहे. अमरावती जिल्हयातील चिखलदरा तालुक्यातील बोरधा या गावामध्ये जाणू सज्जू तोटा हिच्या 8 महिन्यांच्या बाळाला पोटफुगी झाल्यानंतर त्याला आई-वडिलांनी भुमकाकडे (भगत बुवा) नेलं होतं. भुमकानं चिमुरड्याच्या संपूर्ण पोटावर गरम विळ्याने चटके दिले. या प्रकाराला डंबा असं संबोधलं जातं. भरारी पथकाला याची महिती मिळताच 8 महिन्यंच्या श्यामला वैद्यकीय उपचारार्थ हलविले तर आई वडिलांना विचारणा केली असता हा प्रकार समोर आला. तर दुसरीकडे याच बुवा बाजीमुळे एका गर्भवती महिलेला देखील आपल्या प्राणाला मुकावे लागलं आहे. मेळघाटमध्ये कुपोषणाची मुख्य समस्या असताना येथील आदिवासी अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर काढण्यास प्रशासन अजुन यशस्वी झालेलं नाही, अशी माहिती अंनिसचे हरीष केदार यांनी सांगितलं आहे. याआधीही असाच एक प्रकार समोर आला होता. हतरु येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एक महिला प्रसूती झाली.  तिने 2 किलो 800 ग्राम वजनाच्या बालकाला जन्म दिला होता. दवाखान्यातून सुट्टी घेऊन घरी गेल्यावर या बालकाच्या पोटावर फुगारा आल्याने त्यांनी बालकाला गावातील भूमक्याकडे (भगत) नेले. या भूमक्याने बालकाच्या पोटावर गरम सळईनं चटके दिले होते. यामुळे बालकाची प्रकृती बिघडली होती. बालकाला चुरणी येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले असता 20 मिनिटांत त्याचा मृत्यू झाला. मेळघाटात बालक आजारी पडल्यास त्याला पोटावर चटके दिले जाते याला 'डंबा' असे म्हणतात. हेही वाचा..उपासमारीचा बळी! सलून व्यावसायिकाचा अखेर मृत्यू, पोटच्या मुलासोबत घेतलं होतं विष दरम्यान, मेळघाटात अनेक शासकिय व NGO काम करत असले तरी या घटनेनंतर आजही मेळघाटातील आदिवासींमध्ये अंधश्रद्धा कमी झाली नसल्याचे स्पष्ट होत आहे.
Published by:Sandip Parolekar
First published: