मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

भररस्त्यात सुनील तटकरे अन् मंत्री रवींद्र चव्हाण समोरासमोर! खड्ड्यांवरुन टोलवा-टोलवी

भररस्त्यात सुनील तटकरे अन् मंत्री रवींद्र चव्हाण समोरासमोर! खड्ड्यांवरुन टोलवा-टोलवी

कोकणातील खराब रस्त्यांवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे आणि मंत्री रवींद्र चव्हाण आज समोरासमोर आलेले पाहायला मिळाले.

कोकणातील खराब रस्त्यांवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे आणि मंत्री रवींद्र चव्हाण आज समोरासमोर आलेले पाहायला मिळाले.

कोकणातील खराब रस्त्यांवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे आणि मंत्री रवींद्र चव्हाण आज समोरासमोर आलेले पाहायला मिळाले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

रायगड, 26 ऑगस्ट : गेल्या काही दिवसांपासून रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्ंयावरुन राजकारण सुरू आहे. यात आता राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आणि भाजप आमदार रविंद्र चव्हाण आमने-सामने आले आहेत. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्ती कामाची पाहणी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली. यावेळी महामार्गावरच कामाच्या ठिकाणी त्यांची आणि खासदार सुनिल तटकरे यांनी भेट झाली. चव्हाण हे दौऱ्याच्या वेळेपेक्षा जलद आल्याचे सुनील तटकरे यांनी म्हटल्यानंतर हे गतिमान सरकार आहे, असा टोला रवींद्र चव्हाण यांनी लगावला. तर सरकार आमचे होते ते देखील गतिमान होतं. हे सरकार तर प्रचंड गतीमान आहे. गेली 40 वर्ष जनतेत काम करत आहे. रस्त्याचा विषय हा राजकारण करण्याचा नाही, असं प्रतित्युत्तर राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी दिलं.

खड्डे बुजवण्यासाठी नवं तंत्रज्ञान : मंत्री रवींद्र चव्हाण

नागोठणे, कामत ,वाकण, सुकेळी, खांब या ठिकाणी मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरुस्तीची रविंद्र चव्हाण यांनी पाहणी केली. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे कोल्ड मिक्स प्रेमिक्स या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून रस्त्यातील खड्डा स्वच्छ केला जातो. त्यानंतर त्यात केमिकलयुक्त डांबर मिश्रित खडी टाकण्यात येते. तसेच त्यावर नंतर छोटा रोड रोलर फिरवून सपाट केले जाते. त्यामुळे पावसाच्या पाण्यामुळे खड्डे होत नाहीत, असे रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

हे रस्ते टिकणार नाही : तटकरे

तटकरे म्हणाले, की मी नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना विनंती केली आहे. मात्र, हा काही राजकारणाचा विषय नाही. पुढील वर्ष, दीड वर्षांत काम होईल. कोकणात अतिवृष्टी होत असल्यामुळे डांबरी रस्ते टिकत नाहीत. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडत आहेत. सातत्याने पाऊस आहे. अशावेळी ज्या पद्धतीने खड्डे (Potholes) भरले जात आहेत, ते टिकणार नाही. त्यामुळे सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करायला हवे, असे सुनील तटकरे म्हणाले.

Eclectic Vehicles : नितीन गडकरींची मोठी घोषणा, वाहनचालकांना मिळणार दिलासा

त्यांनीदेखील राजकारण करू नये : चव्हाण

रस्त्यांवरचे खड्डे ही कोकणातील मोठी समस्या आहे. हे खड्डे भरण्यासाठी टेक्नॉलॉजी बदलली पाहिजे. मंत्री म्हणून मी त्यांचे स्वागत करतो. मात्र, त्यांनीदेखील राजकारण करू नये. उदासीनता आणि गतीमानता अजून स्पष्ट झाली नाही. नव्याची नवलाई अजून दिसून यायची आहे, असा टोला त्यांनी रवींद्र चव्हाण यांना लगावला आहे.

भाजपा-शिंदेंचे सरकार गतीमान : चव्हाण

रवींद्र चव्हाण यांनीदेखील त्यांच्यावर पलटवार केला आहे. सुनिल तटकरे काय म्हणतात, याला महत्त्व नाही. त्यांना खरेच वाटत असावे की भाजपा आणि शिंदेंचे सरकार हे गतीमान सरकार आहे, म्हणून ते बोलले असतील, असा टोला त्यांनी लगावला आहे. जिथे दोन जण काम करत होते तिथे आम्ही 10 जण कामाला लावली आहेत. तटकरे यांनी कितीही टीका केली तरी आमचे सरकार हे गतीमान आहे. भविष्यात कल्याण-डोंबिवली आणि इतर शहरातही खड्डे बुजविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, ती त्यांना भरघोस निधी नगर विकास खात्यातून या सगळ्या महापालिकांना द्यावा, अशी विनंती त्यांनी केली.

First published:

Tags: Sunil tatkare