ठाणे, 21 नोव्हेंबर: दिवाळीआधी आईनं आपल्या मुलाकडे कष्टानं कमावलेले पैसे ठेवायला दिले होते. मात्र, आईनं पैसे परत मागताच मुलानं 'मला एका महिलेने संमोहित केलं होतं. माझ्याकडे असलेले पैसे घेवून ती महिला पळून गेली. असं सांगितलं होतं. परंतु आता मुलाचं बिंग फुटलं आहे. समोर आलेल्या माहितीमुळे आईसह पोलिसही चक्रावले आहेत.
सोहन पाल असं आरोपी मुलाचं नाव आहे. पोलिसांनी आरोपीला रक्तानं माखलेल्या कपड्यात जखमी अवस्थेत आरेच्या झुडूपातून शोधून काढलं.
हेही वाचा...कुटुंबासोबत किल्ल्यावर भ्रमंतीसाठी आलेली महिला कोसळली खोल दरीत, अन्..
'मला एका महिलेने संमोहित केलं होतं. माझ्याकडे असलेले पैसे घेवून ती महिला पळून गेली. तिला अडवण्याचा प्रयत्न केला पण महिलेने तिच्या जवळील ब्लेडनं माझ्यावर सपासप वार केले. मला जखमी करुन माझ्याकडील 4 लाख रुपये घेवून ती पळून गेली', असा बनाव सोहम पाल या तरुणानं पोलिसांकडे केला होता. मात्र, त्यानं सर्व पैसे दारुत खर्च केल्याचं समोर आलं आहे.
काय आहे प्रकरण?
कष्ट करुन पै पै जमवून 4 लाख रुपये सोहनच्या आईनं दिवाळीपूर्वी सोहनकडे ठेवायला दिले होते. काही दिवसांनी आईनं ते पैसे सोहनकडे परत मागितले. तेव्हा संध्याकाळी पैसे आणून देतो, असं सांगून सोहन घराबाहेर पडला. मात्र, रात्री पोलिसांचा फोन सोहनच्या आईला आला आणि सोहनने आई व पोलिसांना त्याच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. गेल्या तीन दिवसांपासून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पण काहीच हातात लागत नाही, हे लक्षात आल्यावर पोलिसांनी तिसऱ्या दिवशी पुन्हा सोहनची चौकशी केली यावेळेस मात्र सोहन गडबडला आणि त्याचं बिंग फुटलं.
सोहन आरेच्या झुडूपात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पोलिसांना सापडला. सोहन सोबत काय घडले हे त्याने पोलिसांना सांगितले. अगदी चित्रपटात घडावी तशी घटना सोहन सोबत घडली आणि तो गंभीर जखमी झाला. सोहननं सांगितल्याप्रमाणे पोलिसांनी तपास केला आणि त्या महिलेचा शोधही घेतला. महिला काही सापडली नाही. पण सोहनसोबत नेमकं काय घडलंय हे पोलिसांना कळताच पोलिसांच्या पाया खालची वाळूच सरकली आहे.
हेही वाचा..अमरत्त्व मिळवण्याच्या नादात मामाभाच्यासह तीन तरुणांनी गमावला जीव, धक्कादायक घटना
मुलानं आईचं स्वप्न धुळीस मिळवलं
घर घेण्यासाठी सोहनच्या आईनं पै पै करून पैसे जमवले होते. विश्वासानं ते आपला मुलगा सोहनकडे ठेवायला दिले होते. पण दारु करता सोहननं ते बाईवर उडवले. आईचं सर्व स्वप्न धुळीस मिळवलं. आता हे प्रकरण न्यायालयात पोहोचले आहे. न्यायालयाच्या आदेशाने पोलिस गुन्हा दाखल करुन पुढील कारवाई करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Maharashtra, Mumbai police, Thane