महापलिका अधिकाऱ्याच्या भरधाव कारने मायलेकांना चिरडले, दोघांचा जागीच मृत्यू

महापलिका अधिकाऱ्याच्या भरधाव कारने मायलेकांना चिरडले, दोघांचा जागीच मृत्यू

मालेगाव महापलिकेच्या अधिकाऱ्याच्या भरधाव कारने दुचाकीवरून जाणाऱ्या मायलेकांना चिरडले. मायलेकांचा जागीच मृत्यू झाला आहे.

  • Share this:

बब्बू शेख, (प्रतिनिधी)

मनमाड, 20 ऑगस्ट- मालेगाव महापलिकेच्या अधिकाऱ्याच्या भरधाव कारने दुचाकीवरून जाणाऱ्या मायलेकांना चिरडले. मायलेकांचा जागीच मृत्यू झाला आहे. मालेगाव-सटाणा मार्गावर ही धक्कादायक घटना घडली आहे. अपघातनंतर अधिकारी व त्यांच्या मित्र घटनास्थळावरून पळ काढला होता. मात्र, गावकऱ्यांनी त्यांच्या कारचा पाठलाग करून तिघांना पकडून पोलिसांच्या हवाले केले.

रोशन शिवाजी देवरे व शीलाबाई शिवाजी देवरे असे मृत मायलेकाचे नाव आहे. तर राजेंद्र खैरनार असे या कारचालकाचे नाव असून तो मालेगाव महापलिकेत अतिक्रमण निर्मुलन विभाग प्रमुख आहे. मिळलेली माहिती अशी की, राजेंद्र खैरनार व त्याचे दोन मित्र कारने (MH-14,BC-8496) सटाण्याकडे जात होते. त्यांच्या भरधाव कारने रोशन देवरे या तरुणाच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. अपघातात रोशन आणि त्याची आई शीलाबाई यांचा जागेवरच मृत्यू झाला. अपघातनंतर अधिकारी व त्यांच्या मित्रांना पळ काढला होता. मात्र, प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी कारचा पाठलाग करून तिघांना पकडून पोलिसांच्या हवाले केले.

दारूच्या नशेत होते तिघे

राजेंद्र खैरनार यांच्यासह त्याचे दोघे मित्र दारूच्या नशेत होते, असा संशयही नागरिकांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी मालेगावच्या वडनेर खाकुर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातात खैरनार यांना ही किरकोळ मार लागला असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहे.

...तर मारलंच असतं, ठाणे महापौराच्या पदाधिकाऱ्याची मराठा कार्यकर्त्यांना धमकी

Published by: Sandip Parolekar
First published: August 20, 2019, 2:09 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading