Home /News /maharashtra /

राज्यात उष्णतेची लाट, कुलाबा वेधशाळेनं वर्तवला महत्त्वाचा अंदाज

राज्यात उष्णतेची लाट, कुलाबा वेधशाळेनं वर्तवला महत्त्वाचा अंदाज

पूर्वमोसमी पावसाला राज्यात पोषक वातावरण आहे. त्याचबरोबर राज्याच्या हवामानात वेगाने बदल होत आहे.

    मुंबई, 24 एप्रिल: राज्यात कोरोना व्हायरसचं संकट आहे. त्यात पुढील काही दिवस राज्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण-मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे. पुढील चार ते पाच दिवस सरासरी कमाल तापमानपेक्षा जास्त तापमान राहणार आहे. तापमान पारा आणखी वाढणार असल्याचंही कुलाबा वेधशाळेने म्हटलं आहे. दरम्यान, पूर्वमोसमी पावसाला राज्यात पोषक वातावरण आहे. त्याचबरोबर राज्याच्या हवामानात वेगाने बदल होत आहे. उन्हाचा चटका वाढला आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी 40 अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. हेही वाचा.. देवेंद्र फडणवीसांच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पुन्हा पत्र, आता केली 'ही' मागणी दुसरीकडे, 2020 मधील उष्णतेबाबत भारतीय हवामान विभागाने (IMD)अनुमान अहवाल नुकताच जाहीर केला आहे. त्यामुळे यावर्षी उष्णतेची लाट तीव्र स्वरूपात असून नागरीकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असे, आवाहन करण्यात आलं आहे. उष्ण वातावरणामुळे नागरिकांना होणारे आजार व सद्या सुरू असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव यामुळे दवाखान्यातील गर्दीबाबत नियोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. उष्णतेमुळे होणारे आजार व मृत्यू टाळण्यासाठी नागरिकांनी उपाययोजना राबवाव्यात. कारण अगोदरच आरोग्य यंत्रणेचा कोरोनाबाबत लढा सुरू असल्याने तसेच आता येणाऱ्या उष्णतेमुळे लोकांची प्रतिकारक शक्ती कमी होवून संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर्षी उष्णतेची लाट तीव्र स्वरूपात असल्याने आवश्यक काळजी घेणे गरजेची आहे अशा सूचना भारतीय हवामान खात्याने दिल्या आहेत. याबाबत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाने या उष्णतेच्या परिणामांपासून बचाव करण्यासाठी काय करावे व काय करू नये याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्याचे पालन प्रत्येक नागरीकांनी करावे असं आवाहन करण्यात आलं आहे. हेही वाचा...कोरोनाच्या उपचारासंदर्भात मोठी बातमी, महाराष्ट्रात प्लाझ्मा थेरपीला केंद्राची मंजुरी मे महिन्यातील पहिल्या दोन आठवडयात विदर्भात तापमान 45 अंश सेल्शीयस पेक्षा जास्त जाणार असल्याचे हवामान खात्याने अंदाज व्यक्त केले आहेत. याचवेळी भारतातील काही भागात 51 अंश सेल्शीयस पर्यंत तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. उष्णतेपासून होणारा धोखा लक्षात घेवून जिल्हास्तरावर विविध आराखडा तयार करून त्याबाबतचा परिणाम कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. संकलन, संपादन- संदीप पारोळेकर
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    पुढील बातम्या