गोरक्षणाच्या नावावर काही लोकं धुडगूस घालत आहे-सुमित्रा महाजन

गोरक्षणाच्या नावावर काही लोकं धुडगूस घालत आहे-सुमित्रा महाजन

भारताच्या सांस्कृतिक जीवनात गाईला खूप महत्व आहे. पण गायीच्या नावावर हिंसा खपवून घेतली जाऊ शकत नाही असंही त्या म्हणाल्या

  • Share this:

पुणे,12 नोव्हेंबर:  गोरक्षणाच्या नावावरून काही लोक धूडगूस घालत आहे असं विधान लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी केलं आहे. त्या भगिनी निवेदिता यांच्या 150 व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.

गोरक्षेच्या नावावर सध्या देशात अनेक हिंसाचार घडले आहेत. दादरीला झालेला हिंसाचार असेल किंवा ऊनाला झालेला हिंसाचार. गोरक्षेच्या मुद्दयावरून सध्या अनेक वाद होत आहेत. गोरक्षेच्या मुद्द्यावरून गोरक्षक हिंसाचार करत असल्याचंही सांगण्यात येतं आहे. यावरच आज सुमित्रा महाजन यांनी आपलं मत मांडलं आहे. त्यांनी तथाकथीत गोरक्षकांना चांगलच फटकारलं आहे.' भारताच्या सांस्कृतिक जीवनात गाईला खूप महत्व आहे. पण गायीच्या नावावर हिंसा खपवून घेतली जाऊ शकत नाही असंही त्या म्हणाल्या'. विवेकानंद केंद्रातर्फे भगिनी निवेदीता यांच्या 150 व्या जयंतीनिमीत्त पुस्तक लोकार्पण सोहळ्यात त्या बोलत होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 12, 2017 01:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading