• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • सुकाणू समितीला कर्जमाफी अमान्य

सुकाणू समितीला कर्जमाफी अमान्य

सरकारनं कर्जमाफी देताना निकषांच्या चौकट लावून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप सुकाणू समितीनं केलाय.

  • Share this:
 25 जून : सरकारनं कर्जमाफी देताना निकषांच्या चौकट लावून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप सुकाणू समितीनं केलाय. सरकारनं जाहीर केलेली कर्जमाफी मान्य नसल्याचं सुकाणू समितीनं म्हटलंय. मुंबईत सुकाणू समितीची बैठक झाली. या बैठकीत राजू शेट्टी, बच्चू कडू वगळता जवळपास सगळेच नेते उपस्थित होते. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देताना कर्जाची मर्यादा ठेवूच नये अशी मागणी रघुनाथदादा पाटील यांनी केलीये. हमीभावाबाबतही सरकारनं स्पष्ट धोरण ठरवलं नसल्याचा आरोप अजित नवलेंनी केलाय.
First published: