शेतकरी आंदोलनासाठी सुकाणू समिती स्थापन,राजू शेट्टींसह रघुनाथदादा पाटलांचा सहभाग

शेतकरी आंदोलनासाठी सुकाणू समिती स्थापन,राजू शेट्टींसह रघुनाथदादा पाटलांचा सहभाग

या समितीत राज्यातले अनेक दिग्गज शेतकरी नेते सहभागी आहेत. ही समिती शेतकरी आंदोलनाची दिशा ठरवणार आहे.

  • Share this:

05 जून : शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी नवी सुकाणू समिती गठीत करण्यात आलीये. या समितीत राज्यातले अनेक दिग्गज शेतकरी नेते सहभागी आहेत. ही समिती शेतकरी आंदोलनाची दिशा ठरवणार आहे.

या समितीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील, आमदार बच्चू कडू यांच्यासर अनेक शेतकरी आंदोलनाचे नेते सहभागी असणार आहे. याआधी काही शेतकरी संघटनांनी पुढाकार घेऊन संप मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता ही नवी समिती काय पावलं उचलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

कोण आहे सुकाणू समितीत ?

खा.राजू शेट्टी, अजित नवले, रघुनाथदादा पाटील

संतोष वाडेकर, संजय पाटील, आ.बच्चू कडू

विजय जावंधिया, राजू देसले, गणेशकाका जगताप

चंद्रकांत बनकर, एकनाथ बनकर, शिवाजी नाना नानखिले

डॉ.बुधाजीराव मुळीक, डॉ.गिरीधर पाटील, गणेश कदम

करण गायकर, हंसराज वडघुले, अनिल धनवट

First published: June 5, 2017, 11:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading