मुंबई, 08 मार्च : विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे हे भाजपमध्ये जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून सुजय विखे हे भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यावर आता शिक्कामोर्तब झाल्याचं सांगण्यात आहे. भाजपमधून तिकीट मिळावं यासाठी सुजय विखे प्रयत्नशील होते. यासंदर्भात भाजपचे गिरीश महाजन आणि सुजय विखे यांच्यामध्ये आज बैठक झाली आहे. त्यामुळे सुजय यांना भाजपमधून तिकीट मिळणार हे आता निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये गुप्त बैठका सुरू असल्याच्या चर्चा रंगत असताना 'मी विखेंना भेटलोच नाही' असं शरद पवार म्हणाले. त्यामुळे राष्ट्रवादीतून सुजय यांना तिकीट मिळणार नाही हे नकळत का होईन पवारांनी स्पष्ट केलं. काँग्रेसमधूनही त्यांना उमेदवारी देणं शक्य नाही. त्यामुळे आता भाजपमधून तिकीट मिळणं हाच एक पर्याय सुजय विखे यांच्यासमोर होता.
पण आता सुजय विखे पाटली यांच्यानंतर राधाकृष्ण विखे पाटीलसुद्धा भाजपमध्ये जाणार का अशा चर्चांना उधाण आलं आहे. तर सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारीवरून गेल्या काही दिवसांत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. अशातच ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचीही तुफान चर्चा होती. पण त्यावर पवारांच्या वक्तव्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला.
तर एकीकडे सुजयने निर्णय घ्यावा, कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी आहेत असंही त्यांना सांगण्यात आलं होतं. प्रवरा नगर कारखान्यात एक बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये अशी चर्चा करण्यात आली होती. तर महाआघाडीच्या दोन्ही संयुक्त मेळाव्यात विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची अनुपस्थिती होती. अशोक चव्हाण यांनी आयोजित केलेल्या नांदेड येथील सभेत ही नव्हते, तर राष्ट्रवादीने परळी इथे आयोजित केलेल्या मेळाव्याला ही गेले नव्हते. नगरच्या जागेबाबत अजून ही निर्णय होत नसल्याने विखे पाटील नाराज असल्याची चर्चादेखील रंगत आहे.
VIDEO: राज्यसभेच्या चर्चांवर विखे पाटील म्हणाले...!