Home /News /maharashtra /

लग्नाला नकार देऊनही तरुण काढायचा छेड, तरुणीने विष पिऊन संपवले आयुष्य, मालेगावातील घटना

लग्नाला नकार देऊनही तरुण काढायचा छेड, तरुणीने विष पिऊन संपवले आयुष्य, मालेगावातील घटना

या तरुणाने एकदा मृत तरुणीला लग्न करण्यासाठी मागणी घातली होती. मात्र या तरुणीने शमीमला लग्नास नकार दिला.

या तरुणाने एकदा मृत तरुणीला लग्न करण्यासाठी मागणी घातली होती. मात्र या तरुणीने शमीमला लग्नास नकार दिला.

या तरुणाने एकदा मृत तरुणीला लग्न करण्यासाठी मागणी घातली होती. मात्र या तरुणीने शमीमला लग्नास नकार दिला.

मालेगाव, 02 जानेवारी: एकतर्फी प्रेमाने (one sided love ) आणखी एका निष्पाप तरुणीचा बळी घेतला आहे. लग्नाला दिलेला नकार आणि त्यातून सतत होत असलेल्या छेडछाडीला कंटाळून एका 20 वर्षीय तरुणीने विष घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना मालेगावच्या जाफरा नगर भागात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिया कासीम असं या तरुणीचे नाव आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. हा सर्व प्रकार एकतर्फी प्रेमातून घडला असून माझ्या बहिणीला आत्महत्या करण्यास भाग पाडणारा तरुणा व त्याच्या साथीदारावर कडक कारवाई करण्याची मागणी मयत तरुणीच्या बहिणी अफरीन शेख हिने केली. मालेगाव शहरातील जाफरनगर भागात मयत तरुणी आई-वडील आणि बहिणी सोबत राहत होती. त्यांना भाऊ नसल्यामुळे वडिलांनी दोघींना उच्च शिक्षण दिले. शिक्षण घेतल्यानंतर मयत तरुणीने ब्युटीपार्लरचा कोर्स करून स्वतःचा व्यवसाय सुरू केला. दोन्ही बहिणी सुंदर आणि सुशिक्षित होत्या त्यांच्यावर याच भागात राहणार शमीम अन्सारी या तरुणाचा डोळा होता. तो मयत तरुणीवर एकतर्फी प्रेम करू लागला मात्र त्याला मयत तरुणीकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून अन्सारी तिचा पाठलाग करू लागला. रस्त्यात तिची अडवणूक करून लग्नाची गळ घालू लागला मयत तरुणीने नकार दिल्यानंतर रात्री अपरात्री घराच्या खिडकीवर दगड मारणे,घरा समोर टवाळखोर जमवून आरडाओरडा करणे असा त्रास देऊ लागला. (RRR ला मिळाली होती 10 कोटींची अ‍ॅडव्हान्स बुकिंग! परत दिले जाणार तिकिटाचे पैसे?) त्रास जास्त वाढल्यानंतर मयत तरुणीच्या वडिलांनी तरुणाच्या घरी जाऊन त्याला व त्याच्या कुटुंबीयाला समजून सांगितले मात्र त्रास सुरूच होती शेवटी पोलीस स्थानकात जाऊन तक्रार दिली. मात्र परिसरातील काही लोकांनी दबाव आणून तक्रार मागे घेण्यास भाग पाडले. तिकडे अन्सारीचा त्रास दिवसेंदिवस वाढत गेला तब्बल तीन वर्षे हा त्रास सुरू होता. तो सहन न झाल्यामुळे अखेर मयत तरुणीने टोकाचे पाऊल उचलत आज विष घेऊन आयुष्य संपविले. (Video:विकीला सोडण्यासाठी कतरिना पोहोचली एअरपोर्टवर, दिलं टाइट hug) आपल्या बहिणीच्या मृत्यूला शमीम आणि त्याचे साथीदार कारणीभूत आहे, त्यांच्यामुळेच माझ्या बहिणीने आत्महत्या केली, त्यामुळे दोषी शमीम आणि त्याच्या साथीदारावर कडक कारवाई करण्याची मागणी, अफरीन शेख हिने केली आहे. या प्रकरणी पवारवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या