बुलडाणा, 02 जुलै : बुलडाणा जिल्ह्यातील जलंब येथे शेतात प्रेमी युगलाने आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. बुधवारपासून हे प्रेमीयुगल बेपत्ता होते. आज दोघांचे मृतदेह शेतात आढळून आले.
शेगाव येथील 17 वर्षीय अल्पवयीन युवती आणि रामेश्वर संतोष अहिरे (वय 22 ) हे दोघेही बेपत्ता होते. या तरुणाविरुद्ध शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाला नवं वळण, मोठ्या दिग्दर्शकाची होणार चौकशी
बुधवारी दुपारपासून दोघेही फरार झाले होते. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी शेगाव पोलीस स्टेशनमध्ये मुलाच्या विरोधात तक्रार दिली होती.
त्यानंतर तरोडा शिवारात या दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. दोघांचे मृतदेह आढळून आल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे.
निगेटिव्ह आलेल्या कोरोनाबाधिताची रेल्वेखाली आत्महत्या
दरम्यान, दौंड तालुक्यातील बोरीपार्धी गावातील एका व्यक्तीने कोरोना आजारावर मात करीत हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर रेल्वे खाली उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. बोरीपार्धी येथे राहणाऱ्या एका 45 वर्षीय व्यक्तीस 24 जून रोजी कोरोनाची बाधा झाल्याची कोरोना चाचणी अहवालात स्पष्ट झाले होते त्यानंतर त्याच्यावर पिंपरी येथील वाय.सी.एम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यानंतर त्याच्या पत्नीचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला होता तिच्यावरही सध्या उपचार सुरू आहेत.
कोरोनाबाधित व्यक्तीची पुन्हा चाचणी केली असता अहवाल निगेटिव्ह आल्याने त्या व्यक्तीस काल घरी सोडण्यात आले होते. काल रात्री ते बोरीपार्धीतील आपल्या घरी आले आणि आज पहाटे त्यांनी बोरीपार्धी मधील रेल्वे गेटाच्या पूर्व बाजूला रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.