नैराश्यावर उचललं धक्कादायक पाऊल, ऑपरेशनच्या त्रासामुळे केली आत्महत्या

नैराश्यावर उचललं धक्कादायक पाऊल, ऑपरेशनच्या त्रासामुळे केली आत्महत्या

संजय कुलकर्णी हे पंढरपूरमधील सोलापूरनगर येथील रहिवासी असून गेल्या काही वर्षांपासून पोटात झालेल्या गाठेमुळे त्रस्त होते.

  • Share this:

पंढरपूर, 09 नोव्हेंबर : पोटात झालेल्या गाठेच ऑपरेशननंतर त्रास असह्य झाल्याने आणि ऑपरेशनमध्ये लाखो रुपयांचा खर्च झाल्याच्या नैराश्यातून एका व्यक्तीने आत्महत्ये केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंढरपूर इथल्या संजय विठ्ठल कुळकर्णी (वय-43) यांनी काल रात्री पोटात झालेल्या गाठेचं ऑपरेशननंतर त्रास असह्य झाल्याने विहीरीत उडी मारुन आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

संजय कुलकर्णी हे पंढरपूरमधील सोलापूरनगर येथील रहिवासी असून गेल्या काही वर्षांपासून पोटात झालेल्या गाठेमुळे त्रस्त होते. काही दिवसांपासून पुणे येथील गॅलीक्सी हॉस्पीटल इथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. तीन दिवसांपूर्वी त्यांच्या पोटातील गाठेच ऑपरेशन झालं होतं.  ते कालच पंढरपूरमध्ये दाखल झालेले होते. ऑपरेशनसाठी 3 ते 4 लाखांचा खर्च झाला. हा त्रास असह्य झाल्यामुळे नैराश्यातून त्यांनी आत्महत्यचं पाऊस उचललं.

इतर बातम्या -ओढणीने केला प्रेमाचा खून, 1400 किलोमीटरून आरोपी प्रियकराला घेतलं ताब्यात

संजय हे शिकलेले असले तरी घरगुती कामं करत होते अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. त्यांचे भाऊ सतिश कुलकर्णी हे गोपाळपूर येथे शाळेत शिक्षक आहेत. संजय हे त्यांच्याबरोबरच सोलापूर नगर येथील घरात रहात होते. आपला भाऊ सतिश यांना आपल्या ऑपरेशनसाठी झालेला लाखो रुपयांचा खर्च व होणारा असह्य त्रास या नैराश्यातून संजय यांनी आत्महत्यचं पाऊल उचलल्याचं समजतं.

इतर बातम्या -फडणवीसांची परीक्षा: 18 अपक्ष आमदारांकडून पाठिंबा, सुधीर मुनगंटीवरांचा मोठा दावा

संजय यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी या सगळ्या प्रकरणात कुटुंबीयांची चौकशी करणार असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, विहिरीतून संजय यांचा मृतदेह बाहेर काढला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर यावर आता पुढील तपास सुरू आहे.

इतर बातम्या -अयोध्येनंतर महाराष्ट्रावर फोकस, राजकारणातल्या सगळ्यात मोठ्या 6 घडामोडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 9, 2019 10:08 PM IST

ताज्या बातम्या