साखर उद्योगाचं भवितव्य कठीण, पर्यायाचा विचार करा - गडकरी

साखर उद्योगाचं भवितव्य कठीण, पर्यायाचा विचार करा - गडकरी

'एका मर्यादेपलिकडे साखर उद्योगाला सरकारनं मदत करणं अशक्य आहे. यानंतरही ऐकलं नाही तर तुम्ही जाणे आणि तुमचं भविष्य.'

  • Share this:

पुणे 7 जुलै : देशात साखरेचं झालेलं जास्त उत्पादन हीच खरी समस्या असून कारखानदारांनी इथेनॉल निर्मितीकडे वळलं तरच ते तरू शकतील अन्यथा नाही. आता सरकारलाही फार काही मदत करणं शक्य नाही असं परखड मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. पुण्यात आयजोतित साखर परिषदेत ते बोलत होते. पुण्यात आज साखर परिषदेचा समारोप झाला. या दोन दिवसीय साखर परिषदेत साखर उद्योगासमोरील संकटं आणि त्यावरील उपायांवर सविस्तर चर्चा झाली. शेवटच्या सत्रात अनेक ठरावही पारित केले गेले. राज्य शिखर बँकेच्यावतीने ही साखर परिषद भरवण्यात आली होती.

काय म्हणाले गडकरी?

मी साखर उद्योगात आलो असलो, तरी इतरांनी त्यात पडू नये. कारण साखरेचं भरघोस उत्पादन हीच मोठी समस्या. सध्या मालाला उठाव नाही. या देशात पाण्याची नाही तर नियोजनाची कमकरता आहे. आता कारखानदारांनी साखरेएवजी इथेनॉलचं उत्पादन वाढवावं.

तरुणांच्या 2 गटांत पिस्तुल, तलवारीने तुफान हाणामारी, गोळ्या लागून 3 जण जखमी

एका मर्यादेपलिकडे साखर उद्योगाला सरकारनं मदत करणं अशक्य आहे. इथेनॉल उत्पादन वाढवलं तरच खर्च निघू शकेल. इथेनॉल निर्मितीच्या परवानगीसाठी कारखान्यांना मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं.

साखर कारखाने इथेनॉल निर्मितीकडे वळले तरच वाचतील. साखर कारखान्यांनी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी बायो डिजेल वापरावे. बंद साखर कारखान्यांमधून इथेनॉल निर्मितीसाठी उद्योग मंञालयामार्फत विशेष अर्थसहाय्य योजना तयार करणार आहे.

शरद पवारांचा सल्ला

या परिषदेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी कृषीमंत्री शरद पवारही उपस्थित होते. ते म्हणाले,साखर परिषद भरवल्याबद्दल शिखर बँकेचं अभिनंदन. शिखर बँकेमुळेच साखर उद्योग वाढला, पतपुरवठा मिळाल्यामुळेच कारखाने निघाले.साखर धंदा राज्यात महत्वाचा, देशातले साडेपाच कोटी शेतकरी या धंद्यात आहेत.

पुढचं वर्ष साखर धंदयासाठी अडचणीचं ठरू शकतं,  साखरेला सध्या बाजारात उठाव नाही. केंद्र सरकारने अडचणीतील साखर उद्योगाला मदत करावी. साखर कारखानदारांनी व्यावसायिकता अंगिकारावी. खर्च आणि उत्पादन याचा मेळ घातला गेला पाहिजे. काही कारखाने नफ्यात तर तोट्यात हे गणित कळत नाही.

BMC ला आता अक्षय कुमारचा आधार, मुंबईच्या समस्यावर निघणार तोडगा?

काही कारखान्यांचा उत्पादन खर्च जास्त कसा? असं सांगत आर्थिक शिस्त न पाळणाऱ्या कारखानदारांची पवारांनी कान उघडणी केली. ते पुढे म्हणाले, गाळप हंगाम किती दिवसांचा असावा याचाही विचार व्हावा. गाळपांचे दिवस सरासरी 77 असतील तर वार्षिक खर्चाचा मेळ कसा बसणार.बीटचं उत्पादन वाढले तर साखर कारखाने त्यांचा हंगाम वाढवू शकतात, याचाही विचार व्हावा. साखर कारखाने इथेनॉल निर्मिती मधून नफ्यात येऊ शकतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 7, 2019 05:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading