मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

हत्या की आत्महत्या? मुकादमाने डांबून ठेवलेल्या ऊसतोड मजुराचा संशयास्पद मृत्यू, बीडमध्ये खळबळ

हत्या की आत्महत्या? मुकादमाने डांबून ठेवलेल्या ऊसतोड मजुराचा संशयास्पद मृत्यू, बीडमध्ये खळबळ

खळबळजनक ! मुकादमाने डांबून ठेवलेल्या ऊसतोड मजुराचा संशयास्पद मृत्यू, हत्या की आत्महत्या?

खळबळजनक ! मुकादमाने डांबून ठेवलेल्या ऊसतोड मजुराचा संशयास्पद मृत्यू, हत्या की आत्महत्या?

beed sugarcane worker found dead: बीडमध्ये ऊसतोड मजुराचा मृतदेह आढळून आला आहे. या प्रकरणी त्याच्या नातेवाईकांनी मुकादमावर गंभीर आरोप केला आहे.

बीड, 31 ऑक्टोबर : एका ऊसतोड मजुराचा संशयास्पद मृत्यू (sugarcane labour death) झाला आहे. 40 वर्षीय बाळासाहेब सोपान घोडके (Balasaheb Sopan Ghodake) यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला आहे. बीड तालुक्यातील (Beed Taluka) सफेपूर गावातील (Safepur village) ऊसतोड मजूर बाळासाहेब सोपान घोडके यांना केजच्या शिक्षक कॉलनीतील एका बिल्डींगमध्ये मुकादमाने डांबून ठेवल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. यादरम्यान मजुराचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

केजमधील शिक्षक कॉलनीतील मुकादम आणि बिल्डिंग मालक जिवराज केशव हांगे याच्या बिल्डींगमधल्या एका बंद रूममध्ये हा मृतदेह आढळून आला आहे. मुकादम जिवराज केशव हांगे याने 28 तारखेला ला बाळासाहेब घोडके यांना सफेपूर गावातून गाडीत बसवून केजमध्ये डांबुन ठेवल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी मुकदमा विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून नातेवाईक आक्रमक झाल्याचे चित्र आहे. तर मुकादम हांगे याला अटक करण्याची मागणी केली जात आहे. बीड जिल्हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. दरम्यान ऊसतोड मजूर आणि मुकादम सध्या कारखान्याकडे जात आहेत. मजुर हे मुकादमांकडून उचल स्वरूपात काही रक्कम घेतात आणि याच आर्थिक व्यवहारामुळे अनेक घटना घडलेल्या आहेत. यामुळं ऊसतोड मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

वाचा : दिवाळीसाठी घराला रोषणाई करताना साताऱ्यातील कुटुंबाला शॉक, पतीचा मृत्यू तर पत्नीसह दोन मुलं गंभीर जखमी

यापूर्वीही घडल्या आहेत धक्कादायक घटना

2012 मध्ये एका ऊसतोड कामगाराला जिवंत जाळण्यात आल्याचा प्रकार घडला होता. बीडमधल्या गेवराई तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली होती. इथल्या सिंदफणा-चिंचोली गावात एका ऊस तोडणी कामगाराला जिवंत जाळण्यात आलं होतं. शहादेव मासोबा तायड असं या मजूराचे नाव होतं. शहादेव हा सांगलीमध्ये ऊसतोडणीच्या कामावर होता. त्याने गेवराईमधल्या वशिष्ठ डाके याच्याकडून पाच हजार रूपये घेतले होते. शहादेव घरी आला असताना त्याचे वशिष्ठबरोबर वाद झाला आणि त्यातून वशिष्ठने शहादेववर रॉकेल टाकून त्याला पेटवून दिलं, असा आरोप शहादेवच्या वडिलांनी केला होता. यात शहादेव 95 टक्के भाजला होता आणि त्यातच त्याचा मृत्यू झालेला.

यवतमाळमध्ये सावकारी जाचाला कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या

ऑगस्ट 2021 मध्ये सावकारी जाचाला कंटाळून व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची घटना यवतमाळमध्ये घडली होती. एका मॉड्युलर फर्निचर व्यावसायिकाने सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करून जीवन यात्रा संपविली. तुषार माणिकराव साठवणे असं आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्यांचे नाव होतं. त्याने वडगाव परिसरात मॉड्युलर फर्निचरचा व्यवसाय केला होता. लॉकडाऊनच्या काळात त्याचे दुकान पुर्णतः बंद होते. त्यानंतर अनलॉकच्या प्रक्रियेत दुकान उघडण्यासाठी तुषार यांनी खाजगी सावकार ताटी पलूमवार यांच्याकडून 2 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते.

First published:

Tags: Beed, Crime, Sugarcane, Sugarcane farmer