Home /News /maharashtra /

मोठी बातमी: ऊसदराची कोंडी अखेर फुटली, एकरकमी एफआरपी देण्यास तयार

मोठी बातमी: ऊसदराची कोंडी अखेर फुटली, एकरकमी एफआरपी देण्यास तयार

तर राजू शेट्टी यांनी दिला होता सज्जड इशारा...

सांगली, 18 नोव्हेंबर: सांगली जिल्ह्यातल्या ऊसदराची कोंडी अखेर फुटली आहे. यंदाच्या हंगामात एकरकमी एफआरपी (FRP) देण्याचे जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदारांनी मान्य केला आहे.  सांगलीच्या कडेगावमध्ये पार पडलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatna) आणि जिल्ह्यातल्या कारखानदारांच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी सांगली जिल्ह्यातील सर्व कारखानदारांना मान्य केली आहे. या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हेही वाचा...पत्नी विरह झाला नाही सहन, पतीनं फेसबुक Live करत रेल्वेसमोर मारली उडी सांगली जिल्ह्यातील ऊस गाळप सुरू झाला आहे. सांगली जिल्ह्यातल्या कारखानदारांकडून एफआरपी जाहीर करण्यात आली नव्हती. शिवाय टप्प्याटप्प्यानं एफआरपी देण्याबाबत साखर कारखानदारांनी भूमिका घेतली होती. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. कोल्हापूर जिल्ह्यातल्या साखर कारखानदारांनी एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सांगली जिल्ह्यातल्या कारखानदार आता नेमकी काय भूमिका घेणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिलं होतं. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी बैठक पार पडली होती. मात्र या बैठकीमध्ये कोणताही निर्णय न झाल्याने ही बैठक निष्फळ ठरली होती. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एक रकमी पार्टी मुद्द्यावर ठाम राहत आंदोलनाचा पवित्रा घेण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी कडेगाव येथील सोनहिरा साखर कारखान्याच्या कार्यालयामध्ये जिल्ह्यातील साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेत पुन्हा बैठक पार पडली. या पार पडलेल्या बैठकीमध्ये जिल्ह्यातल्या सर्व कारखानदारांनी एकरकमी एफआरपी देण्याचं मान्य केलेले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेली ऊसदराची कोंडी अखेर फुटली आहे. त्यामुळे यंदाचा ऊस गाळप हंगाम आता सुरळीत पार पडणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदीप राजोबा (Sandeep Rajoba) यांनी दिली आहे. राजू शेट्टी यांनी दिला होता सज्जड इशारा... ऊसतोड मजुरांना 14 टक्के वाढीव मजुरी मिळाली त्याप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही 14 टक्के वाढीव एफआरपी द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केली होता. एफआरपी थकवला तर साखर कारखाने बंद पाडणार, असा इशारा देखील राजू शेट्टी यांनी दिला आहे. हेही वाचा.. 'नाचता येईना आंगण वाकडं' अशीच सरकारची अवस्था, नारायण राणेंची सणसणीत टीका कोल्हापुरात गेल्या आठवड्यात आयोजित करण्यात आलेल्या 19 व्या ऊस परिषदेत राजू शेट्टी बोलत होते. यंदा शेतकऱ्यांना एफआरपी एकरकमी मिळावा. ज्या साखर कारखान्यांनी गेल्यावर्षीचा एफआरपी अजून दिलेला नाही त्यांचे कारखाने सुरु होऊ देणार नाही, असेही राजू शेट्टी यांनी सांगितलं होतं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी सांगली जिल्ह्यातील सर्व कारखानदारांना मान्य केली आहे. या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Maharashtra, Raju Shetti, Sugarcane, Sugarcane farmer, Sugarcane in maharashtra

पुढील बातम्या