स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 16व्या ऊस परिषदेला सुरूवात

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 16व्या ऊस परिषदेला सुरूवात

या परिषदेस आता सुरूवात झाली असून राजू शेट्टींचे व्यासपीठावर आगमन झाले आहे. पहिल्यांदाच सदाभाऊ खोतांशिवाय ही ऊस परिषद होते आहे.

  • Share this:

जयसिंगपूर, 27 ऑक्टोबर:  स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 16 वी ऊस परिषद आज जयसिंगपूरमध्ये होते  आहे . या परिषदेस आता सुरूवात झाली असून राजू शेट्टींचे व्यासपीठावर आगमन झाले आहे.  पहिल्यांदाच सदाभाऊ खोतांशिवाय ही ऊस परिषद   होते आहे.

दरवर्षी या परिषदेतून खासदार राजू शेट्टी उसाच्या दराची मागणी करतात. त्यामुळे या ऊस परिषदेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.2014 सालच्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारमध्ये मित्रपक्ष म्हणून कार्यरत होती. पण आता स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारमधून बाहेर पडलीय. त्यातच याच स्वाभिमानीची मुलुखमैदानी तोफ ओळख असलेल्या सदाभाऊ खोत यांनीही स्वाभिमानी शेतकरी संघटनेला रामराम ठोकून नव्या रयत क्रांती संघटनेची स्थापना केलीय. या परिषदेत खासदार शेट्टी काय बोलणार याकडे साखर कारखानादार आणि सरकारचं लक्ष आहे.

कोल्हापूर , सातारा, सांगली आणि कर्नाटक राज्यातीलही शेतकरी या ऊस परिषदेला उपस्थित असणार आहेत. दरम्यान या ऊस परिषदेपूर्वीच राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेट्टी यांच्यावर टीका करत उसाचा दर म्हणजे मटक्याचा आकडा नाही अशी टीका केली आहे तर रघुनाथदादा पाटील यांनीही साडेतीन हजार रुपये दर देण्याची मागणी केलीय. या सगळ्यावर उद्या शेट्टी काय बोलतात हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 27, 2017 08:33 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading