साखर घेण्यापूर्वी लक्ष द्या, आता पाकिटावर लिहून येणार 'हा' सावधगीरीचा इशारा!

साखर घेण्यापूर्वी लक्ष द्या, आता पाकिटावर लिहून येणार 'हा' सावधगीरीचा इशारा!

सिगरेट आणि तंबाखूच्या पाकिटांवर मोठ्या अक्षरात जे लिहिलेलं असतं तेच आता साखरेच्या पाकिटावरही येणार.

  • Share this:

प्रफुल साळुंखे मुंबई 19 नोव्हेंबर : साखरेचं खाणार त्याला देव देणार अशी म्हण आपल्याकडे चांगलीच ओळखीची आहे. मात्र आता जो साखर खाणार त्याला रोग होणार असं म्हटलं जातं. साखर ही खायला जरी सगळ्यांना आवडत असली तरी आरोग्यासाठी फारशी चांगली नसते. त्यामुळे साखरेला पांढरं विष म्हटलं जातं. जगभरच डायबिटिज असलेल्या पेशंटची संख्या वाढत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेनही चिंता व्यक्त केलीय. साखरेचे दुष्परिणाम लक्षात यावे आणि लोकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी केंद्र सरकार नवा नियम करण्याच्या तयारीत असल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिलीय.

सिगरेट आणि तंबाखूच्या पाकिटांवर मोठ्या अक्षरात लिहिलेलं असतं, की तंबाखू खाणं किंवा सिगारेट पिणं हे आरोग्यासाठी हानीकारक आहे. असं लिहिणं त्या कंपन्यांना बंधनकारक असतं. आता हाच नियम साखरेसाठीही लागू करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहेत. म्हणजे साखर विकत घेताना आता त्यावर लिहिलेलं असेल की साखर खाणं हे आरोग्यास हानीकारक आहे.

शिवसेनेच्या आमदारांमध्ये अस्वस्थता, उद्धव ठाकरे करणार आमदारांशी चर्चा

साखरेविषयी जनजागृती वाढल्याने आता साखर खाण्याचं प्रमाणही कमी झाल्याची माहिती पुढे आलीय. दररोज दर माणसी हे प्रमाण 100 ग्रॅमने कमी झाल्याची माहिती पुढे आलीय. साखरेमुळे डायबिटिज होतो आणि हा आजार पूर्णपणे कधीच कमी होत नाही. नियंत्रण आणि पथ्य हाच त्यावर उपाय असतो. त्यामुळे साखर खाताना विचार करा असं सांगितलं जातं. आता सरकारच जर साखरेंच्या पाकिटावर सावधगीरीचा इशारा देणार असेल तर तो मोठा निर्णय ठरणार आहे.

 

 

First Published: Nov 19, 2019 07:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading