मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सुधीर मुनगंटीवार यांचा मंत्री होताच पहिला मोठा निर्णय, फोनवर बोलताना आता 'हॅलो' नाही, 'वंदे मातरम्' बोलायचं

सुधीर मुनगंटीवार यांचा मंत्री होताच पहिला मोठा निर्णय, फोनवर बोलताना आता 'हॅलो' नाही, 'वंदे मातरम्' बोलायचं

सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार

राज्यात शासकीय कार्यालयात आता 'हॅलो' ऐवजी 'वंदे मातरम्'ने संभाषणाला सुरुवात होणार आहे.

  • Published by:  Chetan Patil
मुंबई, 14 ऑगस्ट : राज्यात शासकीय कार्यालयात आता 'हॅलो' ऐवजी 'वंदे मातरम्'ने संभाषणाला सुरुवात होणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतची घोषणा केली आहे. हे वर्ष भारतीय स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत असल्याचं औचित्य साधत मुनगंटीवार यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे राज्यातील सरकारी कर्मचारी फोनवर संभाषण करतानाची सुरुवात 'हॅलो'ने नाही तर 'वंदे मातरम्'ने करतील. राज्य मंत्रिमंडळाचं आज खातेवाटप जाहीर करण्यात आलं. यामध्ये सुधीर मुनगंटीवार यांना सांस्कृतिक कार्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली आहे. याशिवाय मुनगंटीवार यांना वन खात्याची देखील जबाबदारी मिळाली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री होताच मुनगंटीवार यांनी मोठी घोषणा केली. "सांस्कृतिक विभागाचा मी पहिला संकल्प महाराष्ट्रात इथून जाहीर करतोय. हॅलो नाही तर वंदे मातरम् बोला. आता चांद्यापासून ते बांद्यापर्यंत मोबाईलवरुन हॅलो ऐवजी वंदे मातरम् बोलून संभाषणाला सुरुवात करा", असं आवाहन सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. (देवेंद्र फडणवीस चमकले, भाजपकडे तगडी खाती, मुख्यमंत्र्यांकडेही भरपूर काही, पण...) सुधीर मुनगंटीवार यांनी ट्विटरवर देखील या निर्णयाची माहिती दिली आहे. "आज मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर होऊन सांस्‍कृतिक खात्‍याची जवाबदारी येताच स्‍वातंत्र्यदिनाच्‍या पूर्वसंध्‍येला सर्व शासकीय कार्यालयांमध्‍ये कर्मचारी फोनवर हॅलो न म्‍हणता वंदे मातरम् म्‍हणत संभाषणाला सुरुवात करतील अशी घोषणा केली. शासन निर्णय लवकरच निर्गमित करण्यात येईल", असं मुनगंटीवार ट्विटरवर म्हणाले.
First published:

Tags: BJP, Sudhir mungantiwar

पुढील बातम्या